२५ एप्रिल रोजी पुणे येथे, रिपाइंचे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन
२५ एप्रिल रोजी पुणे येथे, रिपाइंचे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सासवड : जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ११९/ २०२३ या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ,व विविध विषयाबाबत , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले , संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने, मा. ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब, पुणे ग्रामीण यांच्या यशवंतराव चव्हाण नगर, पाषाण पुणे येथील कार्यालयासमोर जाहीर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव स्टीवन जोसेफ यांनी दिली,
पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे युवानेते गौतम भालेराव यांच्यासह पाच जणांवर प्राणघातक हल्ला करणार्या आरोपींवर जेजुरी पोलीस स्टेशन येथे, भा.द.वि. कलम ३०७ , ३२४, ३२६, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, ११९ यासह अँट्रोसिटी अँक्ट अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत, या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक करण्यात आली असून, यातील प्रमुख आरोपी मोकाट फिरत आहेत, त्यांना अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही, त्यामुळे सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग यांच्या सासवड येथील कार्यालयासमोर दि. ५/ ४ / २०२३ रोजी जाहीर धरणे आंदोलन केले होते, यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने, दोन तीन दिवसांत आरोपींना अटक केले जाईल असे तोंडी आश्वासन देण्यात आले होते, यावेळी आंदोलन कर्त्यांनी चार दिवसांत आरोपींना अटक न केल्यास मा. ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण यांच्या पुणे येथील कार्यालयासमोर जाहीर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता, त्यानुसार रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ, सतिश केदारी, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस, रिपब्लिकन पारधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पवार, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे कार्याध्यक्ष नामदेव नेटके, , रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव स्टीवन जोसेफ यांनी, दि. १२/ ४ / २०२३ रोजी, मा. ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब पुणे जिल्हा यांना संबंधित आरोपींना तात्काळ अटक न केल्यास २५ / ४ / २०२३ रोजी आपल्या कार्यालयासमोर अटक करण्यात येईल असे लेखी पत्र देऊन, सदर पत्राच्या प्रती योग्य त्या कायदेशीर कार्यवाहीसाठी ,मा.नामदार रामदास आठवले , केंद्रीय राज्यमंत्री, मा. चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री पुणे जिल्हा, मा. गृहसचिव साहेब महाराष्ट्र राज्य, मा. पोलीस महासंचालक साहेब महाराष्ट्र राज्य, मा. अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती, महाराष्ट्र राज्य, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, कोल्हापूर परीक्षेत्र, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड , व मा. पोलीस निरीक्षक साहेब, चतुरश्रुंगी पोलीस स्टेशन पुणे, यांना दिल्या आहेत, परंतु आजतागायत पोलीस प्रशासनाला उर्वरित आरोपींना अटक करण्यात यश आलेले दिसत नाही, त्यामुळे याबाबींकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी , रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार व रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी यांच्या नेतृत्वाखाली, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले, रिपब्लिकन नेते हरेशभाई देखणे रिपब्लिकन पक्षाचे मा.जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस यांच्या अध्यक्षतेखाली , मंगळवार दि. २५ / ४ / २०२३ रोजी सकाळी ठीक ११ – वाजता मा. ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर जाहीर धरणे आंदोलन करण्यात येणार असून, सदर आंदोलनास , रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पुणे शहराचे अध्यक्ष सुरज गायकवाड, श्रमिक ब्रिगेडचे युवानेते अमर कनोजिया, मंगेश सोनवणे दत्ताभाऊ गायकवाड, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे नेते शकुरभाई शेख, सत्तारभाई शेख, किशोर पंडागळे ,सुभाष सहजराव , अनिल गायकवाड, अरुण जाधव, दिपक ओव्हाळ , भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब कांबळे सिताराम शिंदे , यासह पुरंदर तालुक्याचे लोकनेते नामदार रामदासजी आठवले साहेब, यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे मान्यवर पदाधिकारी सदर आंदोलनास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव स्टीवन जोसेफ यांनी दिली,