नागपूर वज्रमूठ सभेत भाषण करणार नाही – अजित पवार
नागपूर : महाविकास आघाडीची नागपूरात दि.१६ एप्रिल रोजी दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. दरम्यान,अजित पवार या सभेत बोलणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
अशातच अजित पवारांनी माध्यमांसमोर भाषण करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
नागपूर सभेनंतर नाशिक आणि कोल्हापूर येथे वज्रमुठ सभा पार पडणार आहे. तर प्रत्येक पक्षाच्या दोन मान्यवरांनी भाषण करायचं असं ठरलेले असल्याचे पवारांनी सांगितले. तसेच मागे झालेल्या सभेत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण, शिवसेनाकडून उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे आणि राष्ट्रवादीकडून मी आणि धनंजय मुंडे यांनी भाषण केलं होतं.
त्यामुळे यावेळी आजच्या सभेत आमच्या तर्फे जयंत पाटील आणि अनिल देशमुख भाषण करणार आहेत. देशमुख हे विदर्भातील आहेत. पाटील हे पक्षाचे प्रांतध्यक्ष आहेत. नाना पटोले आणि सुधीर केदार हे बहुतेक भाषण करतील. मर्यादीत वेळेत भाषण जनतेला ऐकायला मिळावं हे या मागचा हेतु आहे. असही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !