पुणे : गौण खनिज अवैध्य खोदकाम व वाहतूक करणाऱ्या इसामावर कठोर कारवाई करण्याची मागणी
पुणे : गौण खनिज अवैध्य खोदकाम व वाहतूक करणाऱ्या इसामावर शासन मार्फत पंच नामा व चौकशी करून कठोर कारवाई करण्याबाबत व स्थानिक प्रशांसन भोर यांच्या मार्फत होणाऱ्या दिरंगाई बाबत.
वरील विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते कि,मौजे भोलावाडे ता.भोर जि. पुणे या गावामधील बुवासाहेबवाडी या हद्दीमधील मधील नवीन गट नंबर ४१९ व जुना सर्वे नंबर ४३ व ४४ (कुंभारकी) इनाम उल्लेख असलेल्या सातबारा वरील बोगस कागद पत्र यांच्या आधारे जमीन खरेदी व विक्री झाल्याचे आढळले आहे सदर बाबत वरिष्ठ कार्यालय येथे चौकशी (अपील)सुरु आहे सदर बाबत चौकशी व पंच नाम्याचे आदेश मा.महसूल आयुक्त कार्यालय पुणे यांनी दिलेले आहे.
पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली होऊन निसर्गावर दुष्परिणाम होत आहे.तसेच शेकडो टन गौण खनिज विना परवानगी उत्खनन व विक्री होते आहे या मुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडत आहे.सदर बाबत भोर तहसील कार्यालय येथे तक्रार दाखल करून देखील कोणतीही कारवाही झालेली आज पर्यंत झाली नाही.असे अवैध्य गौण खनिज उत्खनन करणारे व सातबारा सदरी असणारे सर्व इसमावर महारष्ट्र जमीन महसूल कायदा कलम ४८(७ )व ४८(८)नुसार दंड आकारण्यात यावा व कठोर कारवाई करण्यात यावी सदर बाबत तक्रारदार यांना लेखी स्वरुपात आपले कारवाई बाबत चे आदेश कळवण्यात यावे.
सोबत गौण खनिज उत्खनन बाबत तक्रार अर्ज फोटो ,उत्खनन फोटो ,सातबारा पाठवण्यात आलेले आहेत असे या प्रसीद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !