पांगारे विद्यालयात ई. लर्निंग व संगणक संच वितरण कार्यक्रम संपन्न
पांगारे विद्यालयात ई. लर्निंग व संगणक संच वितरण कार्यक्रम संपन्न.
पांगारे : (अशोक कुंभार) रयत शिक्षण संस्थेच्या न्यू.इंग्लिश स्कुल,पांगारे विद्यालयात आज गुरुवार दि.१३.०४.२०२३ रोजी सकाळी ९.०० वा. ई. लर्निंग व संगणक संच वितरण कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष व अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ ,पुरंदरचे मा.श्री.गुलाबतात्या गायकवाड तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा.सुनीलबापू काकडे प्रसिद्ध उद्योगपती, पुणे, डॉ.सुमित काकडे उपाध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुरंदर,मा.अनिल उरवणे सचिव,रोटरी क्लब ऑफ पुरंदर,पांगारे गावचे सरपंच मा.किरण शेलार,उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायत पांगारे,पोलीस पाटील – मा.तानाजी काकडे ,स्थानिक स्कुल कमिटी सदस्य,रामराजे काकडे व दामोदरआण्णा काकडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे संस्थापक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व वहिनी सौ.लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर ई. लर्निंग व संगणक संच कक्षाचे रिबीन कापून उदघाटन करण्यात आले.मान्यवरांचे स्वागत इयत्ता १० वी च्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व रोटरी क्लब ऑफ पुरंदर चे अध्यक्ष मा.गुलाबतात्या गायकवाड यांनी विद्यालयाच्या एकंदरीत कामकाजाचे कौतुक केले.पुढील शैक्षणिक वर्षात पांगारे गावाची हॅप्पी व्हिलेज म्हणून निवड करण्याचे सूतोवाच केले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आरोग्यशिबिर व वृक्षारोपण असे उपक्रम राबविले जातील अशी माहिती दिली.डॉ. सुमित काकडे आपल्या मनोगतात विद्यालय ग्रामीण व दुर्गम भागातील असून सुद्धा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अग्रेसर असते असा आवर्जून उल्लेख केला.विद्यालयासाठी प्रयोगशाळा कक्ष स्वखर्चाने बांधून देण्याचे सांगितले..रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे माजी अध्यक्ष मा.डॉ. प्रवीण जगतात यांनी विद्यालय ग्रंथपाल कक्ष स्वखर्चाने बांधून देण्याचे जाहीर केले.त्याचबरोबर क्रीडा साहित्य कक्ष रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्यावतीने बांधून देण्यात येईल असे रोटरी क्लबच्या पदाधिकारी यांनी सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.तावरे नंदकुमार यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचा इतिहास व भौतिक सुविधा बाबतच्या समस्या सांगितल्या.
एक ई.लर्निंग संच रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्यावतीने तर डॉ.सुमित काकडे यांनी स्वतः एक ई.लर्निंग संच दिला.त्याचबरोबर पांगारे गावचे सुपुत्र व पुणे येथील उद्योगपती मा.सुनीलबापू काकडे यांनी विद्यार्थ्यांसाठी सहा संगणक संच दिले. वरील साहित्य विद्यालयास मिळवण्यासाठी श्री.वैभव काकडे व मा.प्रवीण ननवरे यांनी विशेष पाठपुरावा केला होता.त्यांचे विद्यालय ऋणी आहे.
कार्यक्रमाचे प्रभावी व सुमधुर आवाजात सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ.निकम मनीषा व सौ.परळे मंगल यांनी केले.आभार उपशिक्षक श्री.भोसले जी. एन मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सौ.कांबळे एस.डी, श्री.पिलाने व्ही.जे,श्री.लडकत पी.सी यांनी अत्यंत चांगले नियोजन केले होते.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !