जगात कोरोनापेक्षा भयानक संसर्ग; भारतात सापडला पहिला रुग्ण…
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जगभरात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. भरातात तर कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे.
त्यातच आता जगात कोरोनापेक्षा भयानक संसर्ग होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या भयानक संसर्गाचा पहिला रुग्ण भारतात सापडला आहे. याचे सॅम्पल WHO कडे पाठण्यात आले आहेत.
या नव्या संसर्गाचे नाव सिल्वर लीफ (Silver Leaf Disease) असे आहे. एका भारतीय शेतकऱ्याला या Silver Leaf Disease ची लागण झाली आहे. हा शेतकरी मशरूमची शेती करतो. हा आजाराचे विषाणू म्हणजे एक विशिष्ट प्रकारची बुरशी आहे. मुख्यत: वनस्पतींपासून याच्या संसर्गाचा धोका असतो.
या व्यक्तीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर या व्हायरसबाबत धक्कादायक खुलासा झाला. यामुळे झाडांच्या पानांचा रंग बदलतो. झाडांपासून मानवाला याचा संसर्ग होता.
या विषाणूची लक्षण काय?
सिल्वर लीफचा संसर्ग झालेल्यांना कायम थकवा जाणवतो. आवाज बदलतो. श्वास घ्यायला त्रास होतो. मात्र. हा विषाणू जीवघेमा नसल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या विषाणूचे नमुने WHO कडे पाठवण्यात आले होते. कोंड्रोस्टेरियम परप्यूरियम असे नाव या विषाणूला देण्यात आले आहे.
कोरोनापेक्षा खतरनाक महामारी येणार? अमेरिका-चीनच्या लॅबमध्ये घातक प्रयोग?
कोरोनाचा कहरानं अवघ्या जगाचं कंबरडं मोडलं. वुहान लॅबमधून कोरोना जगभरात पसरला. मात्र, कोरोनापेक्षा महाभयंकर महामारी येऊ शकते असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. आणि याचं कारण ठरु शकतात अमेरिका-चीन-युरोपमधल्या काही प्रयोगशाळा. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जगभरात आधुनिक प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रयोगशाळांमध्ये कोरोनापेक्षा खतरनाक व्हायरसवर संशोधन सुरु आहे. मात्र, हेच संशोधन घातक ठरु शकतं. चीनच्या वुहान लॅबमधून वुहान मार्केटमध्ये कोरोना पसरला होता. आता तर जगभरात 27 लॅब्समध्ये खतरनाक व्हायरसवर संशोधन सुरु आहे. या लॅबमधून चुकून जरी एखादा व्हायरस बाहेर आला तर अवघी मानवजातच धोक्यात येईल. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.