ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे २१ मे रोजी राज्यव्यापी ” जबाब दो, आंदोलन ” कशासाठी?
ग्रा.वि.मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावांत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे २१ मे रोजी
राज्यव्यापी ” जबाब दो, आंदोलन “
महासंघाच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्धार
——————-
नाशिक – आयटकशी संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक आज दि .७ एप्रिल २०२३ रोजी आयटक कामगार केंद्र, मेघदुत कॉम्लेक्स नाशिक येथे जेष्ठ नेते प्रा .कॉ. तानाजी ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली . महासंघाचे सरचिटणीस कॉ . नामदेव चव्हाण यांनी संघटनेच्या मागील कामकाजाचा अहवाल सादर केला .विविध संघटनात्मक, आंदोलनात्मक तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांच्या संदर्भाने या बैठकीत सविस्तर चर्चा करून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले . राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याच्या संदर्भाने २८ डिसेंबर २०२२ रोजीच्या नागपूर विधानसभेवरील निघालेल्या प्रचंड मोर्चा दरम्यान खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री .एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाची अद्यापही पुर्तता केली नाही .
अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य करून ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना त्वरीत वेतनश्रेणी लागू करा, किमान वेतन समिती मार्फत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनाचे दर पुर्न:निर्धारित करा, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन अनुदानासाठी असलेली लोकसंख्या-आकृतीबंध, कर वसुली व उत्पन्नाची जाचक अट रद्द करुन शासनाने जबाबदारी स्वीकारून पुर्ण वेतन व राहणीमान भत्त्यासाठी सरसकट १०० टक्के लागू करावे, निवृत्तीनंतर जीवन जगण्याचा अधिकार म्हणून ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना पेन्शनचा कायदा लागु करा . राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असलेल्या सर्व गट क व ड च्या पदांची जाहिरात काढून ग्रा.पं. कर्मचाऱ्यांची १० टक्के पद भरती तात्काळ करा , यासह ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या गेल्या कित्येक वर्षापासुन अन्य प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची त्वरीत पुर्तता व्हावी यासाठी आयटकच्या नेतृत्वातील महाराष्ट् राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने ग्रामविकास मंत्री ना . गिरिष महाजन यांच्या जळगांव येथील जनसंपर्क कार्यालयावर २१ मे २०२३ रोजी प्रचंड मोर्चा काढून ” जवाब दो आंदोलन करण्याचा इशारा नाशिक येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत करण्यात आला . यावेळी आयटकचे नेते कॉ . राजू देसले, महासंघाचे कार्याध्यक्ष कॉ . मिलींद गणवीर, ए .बी. कुलकर्णी, मंगेश म्हात्रे, अँड . राहुल जाधव,अमृत महाजन, सखाराम दुर्गुडे, हरिश्चंद्र सोनवणे, वसंतराव वाघ, निळकंठ ढोके, उज्वल गांगुर्डे, गोविंद म्हात्रे, शेख यासीन आदी पदाधिकाऱ्यांसह महासंघाचे अनेक जिल्हयातील निमंत्रीत सदस्य उपस्थित होते .