करोनाच्या वाढत्या प्रकरणांवरून केंद्र सरकार गंभीर; लवकरच नवीन नियमावली जाहीर होणार !
देशामध्ये गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत कोरोना रुग्ण संख्या आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढायला सुरवात झाली आहे. त्याबाबत केंद्रसरकारने चिंता देखील व्यक्त केली आहे.
रुग्ण संख्येचा वाढता वेग पाहता आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेत आहेत.
राज्यांना मिळू शकते नवीन नियमावली-
आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 बाबत नियमित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज ही बैठक झाली. त्याचवेळी, पंतप्रधान मोदींनी कोरोनाबाबत सर्व राज्यांशी आढावा बैठक घेतली आहे. करोनाबाबत लवकरच नवीन नियमावलीही जारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.