छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धची याचिका न्यायालयाने फेटाळली
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यावरुन आरोप – प्रत्यारोप देखिल सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकराने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशीव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याच निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
मात्र आता याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. कोर्टाने सांगितले की, कोणत्याही शहर, रस्त्यांची नावे बदलण्याचा अधिकार हा संपूर्णपणे लोकनियुक्त सरकारचा आहे. हे प्रकरण हायकोर्टासमोर असताना या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने छत्रपती संभाजीनगरकरण्याच्या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळली आहे.