मुलीला वाचवण्यासाठी रानटी डुकराशी भिडली आई
छत्तीसगड : आई ही जगातील अशी व्यक्ती आहे जी आपल्या मुलांसाठी काहीही करण्याची तयारी दाखवते. ती आपल्या मुलांवर इतकं प्रेम करते की त्यांच्यासाठी ती आपले प्राण देण्यासाठी देखील मागेपुढे पाहात नाही.
वेळ प्रसंगी आपल्या बाळासाठी आई दुसऱ्याचे प्राण देखील घेण्यासाठी मागेपुढे पाहात नाही. असाच एक प्रकार समोर आला आहे, जो छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील आहे. येथे एका आईने स्वत:ची पर्वा न करता रानडुकरांसमोर आपल्या मुलीली वाचवण्यासाठी उडी घेतली. या घटनेत आई आपल्या मुलीचे प्राण वाचवण्याच यशस्वी देखील ठरली, मात्र तिने आपले स्वत:चे प्राण मात्र गमावले.
जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या पासन पोलीस स्टेशन हद्दीतील तेलियामार गावात रानडुकरांशी लढताना दुवशीयाबाई (45) यांचा मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. पसन वन परिक्षेत्राचे अधिकारी रामनिवास दहायत यांनी सांगितले की, दुवशीयाबाई शनिवारी तिची ११ वर्षांची मुलगी रिंकी हिच्यासोबत जवळच्या शेतात काळी माती गोळा करण्यासाठी गेली होती, तेव्हा रानडुकराने दोघांवर हल्ला केला. जेव्हा रानडुक्कर रिंकीकडे झेपावले तेव्हा दुवशीयाबाईने खोदणाऱ्या कुदळीने रानडुकरावर हल्ला केला. दुवशीयाबाई आणि रानडुक्कर यांच्यात भांडण झाले, ज्यात दोघेही गंभीर जखमी झाले. काही वेळाने दुवशीयाबाईने रानडुकराला मारले, मात्र रानडुकराचा मृत्यू झाल्यानंतर तिचाही मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आणि वराह तसेच महिलेचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. महिलेच्या कुटुंबीयांना 25 हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात आली आहे, तर उर्वरित 5.75 लाख रुपये सर्व औपचारिकता पूर्ण करून देण्यात येणार असल्याचे आधिकाऱ्यांनी सांगितले.