शेतकऱ्यांचा कोण वाली?लाखोंचे नुकसान शेतकरी आद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत..
शेतकऱ्यांचा कोण वाली ?
सहा एकरावरील ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान शेतकरी आद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत..
सर्व शासकीय कागदपत्राची पुर्तता करूनही शेतकरी हावालदील यांच्याकडे कोणी पाहील का?
घटना २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली
अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण कारखाना परिसरातील देगाव (बु.) येथे ऊसाच्या फडाला आग लागून सहा एकरावरील ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्याचाचे लाखोंच नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून शेतकऱ्याचे अंदाजे ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
६ एकरावरील सर्व ऊसाने पेट घेऊन आगीने रौद्ररूप धारण कैले होते. आगीचे प्रमाण एवढं होते की, आग विझवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करुनही त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. उशिरापर्यंत प्रयत्न करून काहीच फायदा झाला नाही, हाता- तोंडाशी आलेला घास, ऊस जळून शेतकऱ्याचं मोठे आर्थिक नुकसान झाले