पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य दैदिप्यमान – प्रा.त्रिंबकराव काकडे
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य दैदिप्यमान – प्रा.त्रिंबकराव काकडे
महाराष्ट्र :(अशोक कुंभार) न्यू.इंग्लिश स्कुल,पांगारे विद्यालयात आज इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारोह संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.तावरे नंदकुमार प्रमुख वक्ते मा.श्री.त्रिंबकराव काकडे व प्रमुख पाहुणे स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य,मा.रामराजेकाका काकडे म्हणून उपस्थित होते.त्याचबरोबर स्थानिक स्कुल कमिटी सदस्य मा.श्री.निलेश काकडे ही उपस्थित होते.ग्रामस्थ श्री.हरिश्चंद्र माने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता १० वी तील विद्यार्थीनी कु.श्रावणी निंबाळकर हिने केले,अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.तावरे नंदकुमार यांनी विद्यालयाचा संख्यात्मक गुणवत्ता वाढीपेक्षा गुणात्मक निकाल वाढणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले..इयत्ता १० वी तील विद्यार्थी हे भविष्यात देशाचे नागरिक बनतील.ते निश्चितच समाज,आई-वडील व देशाची सेवा करतील.कर्मवीर अण्णांच्या शिक्षण संस्थेत खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शिक्षण दिले जाते असे मत प्रा.त्रिंबकराव काकडे यांनी आपल्या मनोगतात मांडले.स्थानिक स्कुल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री.काकडे रामराजेकाका व श्री.निलेशभाऊ काकडे यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली.
इयत्ता १० वी तील विद्यार्थ्यांनी विद्यालयास एक माईक,माईक स्टँड वायरसहित भेट म्हणून देण्यात आली. इयत्ता ७ वी तील शेलार अनिकेत,कृत्तिका गोंधळी यांनी इयत्ता १० वी तील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.इयत्ता १० वी तील कु.वैष्णवी निंबाळकर, कु.सिद्धी निंबाळकर,कु.श्वेता काकडे ,भूषण माने व आर्यन काकडे यांनी विद्यालयाची कृतज्ञता व्यक्त केली. विद्यालयातील उपशिक्षक श्री.भोसले जी. एन यांनी इयत्ता १० वी तील विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्ज्वल यश मिळो अशी भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांनी कु.गौरी धिवार तर आभार त्याच वर्गातील विद्यार्थी काकडे साई यांनी मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला.