आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मिञमंडळाचे कार्य कौतुकास्पद – मा. आ.भीमराव धोंडे

आष्टीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाताळलेल्या वस्तुंचे प्रदर्शनास माजी आमदार भीमराव धोंडे यांची भेट
आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मिञमंडळाचे कार्य कौतुकास्पद – मा. आ.भीमराव धोंडे
आष्टी : यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जंयतीनिमित्त आष्टी शहरात आठ दिवसापासून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१६ आणि १७ फेब्रुवारी रोजी आष्टीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हातळलेले व त्यांच्या काळातील असलेल्या वस्तु प्रदर्शनास सुरूवात झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज मिञमंडळ चौक यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे भाजपचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.आष्टी शहर शिवजंयती महोत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसापासून विविध उपक्रमांनी सुरू आहे.आज गुरूवार दि.१६ व शुक्रवार दि.१७ रोजी दोन दिवसीय छ.शिवाजी महाराजांनी वापरलेले शस्ञ व त्यांच्या काळातील साहित्यांचे प्रदर्शन आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भरविण्यात आले होते.या प्रदर्शाचे उद्याटन युवानेते डाॕ.अजय धोंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते.आज प्रदर्शन पाहण्यासाठी आले असता ते बोलत होते.याप्रसंगी तहसीलदार विनोद गुडमंवार , पोलिस निरीक्षक हेमंत कदम ,सुनिल रेडेकर, भाजपा तालुकाध्यक्ष साहेब म्हस्के, अँड रत्नदिप निकाळजे,अनंत देवा जोशी,ज्योतीबा रेडेकर,पञकार सचिन रानडे,गणेश दळवी यांच्यासह आदि उपस्थित होते.पुढे बोलतांना धोंडे म्हणाले की,गेल्या आठ वर्षापासून शहरातील शिवजंयती ही इतरांना आदर्श ठरत आहे.विनाअध्यक्ष,विना डिजे व विनापोलिस बंदोबस्तात ही शिवजंयती होत आहे.कायम सामाजिक कार्य करत या छत्रपती शिवाजी महाराज चौक मिञमंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगीतले.पहिल्या दिवशी गुरूवारी शहरातील शाळेंनी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सकाळपासून गर्दी केल्याचे दिसून येत आहे.हे प्रदर्शन पाहण्यासाठी १८ वर्षापर्यंत १० रू तर १८ वर्षापुढील व्यक्तीसांठी ३० रू असे माफक दर ठेवण्यात आला होता. या प्रदर्शनाचा असंख्य शिवभक्तांनी लाभ घेतला या सर्व शिवभक्तांचे छत्रपती शिवाजी महाराज मिञमंडळ चौक यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.