शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा लाक्षणिक संप, जुनी पेन्शन लागू करा – विभागीय अध्यक्ष मेघराज पंडीत
जुनी पेन्शन लागू करा – विभागीय अध्यक्ष मेघराज पंडीत
बीड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य महाविघालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ,संयुक्त कृती समिती तसेच औरंगाबाद विभागात अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे बीड शहरातील शिक्षणाचे केंद्र असलेले किल्ला मैदान येथेल बलभीम कॉलेज समोर एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला असून संपत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे.
असे की महाराष्ट्र राज्य महाविघालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ,संयुक्त कृती समिती तसेच औरंगाबाद विभागात अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना औरंगाबाद विभाग याना महाराष्ट्र शासना कडे शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुधारीत अश्वासित प्रगती लागू करणे,सातव्या वेतन आयोगानुसार 10 20 30 लागू करणे,58 महिन्याची थकबाकी अदा करणे,जुनी पेन्शन योजना लागू करणे,1410 पदाला सातवा वेतन आयोग लागू करणे.या मागण्या साठी दिनांक 15 /2 /2023 रोजी बैठक झाली पंरतु लेखी न मिळाल्या मुळे दिनांक 16/2/2023 रोजी बीड शहरातील शिक्षणाचे केंद्र असलेले किल्ला मैदान येथेल बलभीम महाविद्यालय समोर एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला असून विभागातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत अशी माहीती अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष मेघराज पंडीत यांनी दिली. यावेळी लाला देशमुख,मुळीक पी.एम,चौधरी अशोक,शेळके महारुद्र,मनोज श्रीराम,सुरेखा धोत्रे,रुक्मणी बाई घोलप गणेश जगताप, बापूसाहेब ठोंबरे, अप्पासाहेब शिंदे, प्रवीण कर्डिले,सह संघटनेचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.