सरकार घटनाबाह्य आहे, असं म्हणता. मग घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती कशा चालतात? – संदीप देशपांडे
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, ‘ एकिकडे आरोप करायचे हे खोके सरकार आहे. आणि खोक्यांच्या जाहिरातीवर सामना चालवायचा? हा दुटप्पीपणा झाला. निर्लज्जपणा झाला. निर्लज्जं सदा सुखी… अशी म्हण आहे, त्यासारखंच हे झालंय.
सरकार घटनाबाह्य आहे, असं म्हणता. मग घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती कशा चालतात? आदित्य ठाकरे यांना आव्हान आहे, त्यांच्यात हिंमत असेल तर या जाहिराती नाकाराव्यात, असं आव्हान देशपांडे यांनी दिलंय.
मुंबईः एकिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार अवैध, घटनाबाह्य आहे, असे आरोप करायचे आणि दुसरीकडे सरकारच्या जाहिराती शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना ( Samana ) वृत्तपत्रातून छापून आणायच्या.
बईः एकिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार अवैध, घटनाबाह्य आहे, असे आरोप करायचे आणि दुसरीकडे सरकारच्या जाहिराती शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना ( Samana ) वृत्तपत्रातून छापून आणायच्या.
ही दुटप्पी भूमिका आहे. हा निर्लज्जपणा आहे. हिंमत असेल तर या सरकारच्या जाहिराती नाकारून दाखवा, असं आव्हान शिवसेना (Shivsena) आणि आदित्य ठाकरे यांना देण्यात आलंय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून हे चॅलेंज दिलंय. सामना वृत्तपत्रातून एकनाथ शिंदे सरकारच्या जाहिराती प्रकाशित करण्यावरून मनसेनं आतापर्यंत अनेकदा आक्षेप घेतला आहे. आता मात्र हिंमत असेल तर जाहिराती नाकारा, असं चॅलेंज देण्यात आलंय.
संदीप देशपांडे काय म्हणाले?
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, ‘ एकिकडे आरोप करायचे हे खोके सरकार आहे. आणि खोक्यांच्या जाहिरातीवर सामना चालवायचा? हा दुटप्पीपणा झाला. निर्लज्जपणा झाला. निर्लज्जं सदा सुखी… अशी म्हण आहे, त्यासारखंच हे झालंय.
सरकार घटनाबाह्य आहे, असं म्हणता. मग घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती कशा चालतात? आदित्य ठाकरे यांना आव्हान आहे, त्यांच्यात हिंमत असेल तर या जाहिराती नाकाराव्यात, असं आव्हान देशपांडे यांनी दिलंय.
आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांचा चॅलेंज
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज दिलंय. हिंमत असेल तर वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीला उभे रहा. अन्यथा मी ठाण्यात उभा राहून जिंकून दाखवतो, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेलं हे चॅलेंज सध्या चांगलंच चर्चेत आहे. ३२ वर्षाचा तरुण मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतोय, त्यामुळे शिंदे-भाजप सरकार घाबरलंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
अदानी-मोदी मैत्रीवर संदीप देशपांडे काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि गौतम अदानी यांचे घनिष्ठ संबंध असल्याने गौतम अदानी अचानक श्रीमंत झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. यावरून संदीप देशपांडे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘ असे आरोप याआधीही राजकीय नेत्यांवर झालेले आहेत. काँग्रेस सत्तेत असताना अंबानी यांना लाभ होईल अशा पॉलिसी त्यावेळच्या सरकारने बनवल्या. हा राजकारणचा भाग आहे…तथ्य काय आहे त्यावर आधारित भूमिका असावी.
तथ्य काय आहे शोधण्यासाठी जॉईंट पार्लमेंट्री कमिटी सक्षम आहे असं मला वाटतं.. आर्थिक प्रकरण असेल तर सेबी सारख्या तपास यंत्रणा सत्य शोधू शकतात.. त्या यंत्रणा सक्षम आहेत, अशी भूमिका देशपांडे यांनी मांडली.