पाकिस्तानी ड्रोनमधून आलेले शस्त्र, ड्रग्ज जप्त..
चंदिगड : पाकिस्तानी ड्रोनमधून पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाठविण्यात आलेले शस्त्र आणि मादक पदार्थ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले आहे.
यात पोलिसांनीही जवानांना मदत केली. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात चीन बनावटीच्या पिस्तूल, काडतुसा आणि तीन किलो हेरॉईनचा समावेश आहे.
पंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी आज शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. तरणतारण जिल्ह्यातील खेमकरण येथे ड्रोन दिसल्यानंतर त्याबाबतची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिस आणि बीएसएफच्या जवानांनी संयुक्त मोहीम राबवली आणि हा साठा जप्त केला. गुरुवारी सकाळीदेखील बीएसएफच्या जवानांनी Pakistani drones पाकिस्तानच्या ड्रोनवर गोळीबार करून ते पाडले होते. तर, त्याच्या एक दिवस आधी पाकी ड्रोन त्यांच्याच हद्दीत पाडण्यात आले होते.