कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यापारी यांनी लूट करू नये- मनसेचे कैलास दरेकर
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230207-WA0006.jpg)
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यापारी यांनी लूट करू नये.
मनसेचे कैलास दरेकर
……………………………..
आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा या पिकाची लागवड केली शेतकऱ्यांना कांदा उत्पादन घेऊन आर्थिक समृद्धी होईल असे वाटले परंतु घडलं वेगळे कांद्याला भाव हा ८ते१०रूपये किलोच्या वर मिळेना त्यातच कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापारी यांनी ५०किलोच्या गोणी २किलो घट घेतल्याचा प्रकार घडत आहे यामुळे मनसेच्या शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की व्यापारी यांनी शेतकऱ्यांना अशा प्रकारे लूटू नये नसता आपली तक्रार मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे करू असे सांगितले तसेच शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन केले की अशा प्रकारे आपण आपली लुट होऊ देऊ नये असा प्रकार घडत असल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तसेच मा.तहसिदार यांच्याकडे करण्यास सांगितले आहे. गोणी पाठीमागे दोन किलो वजनात घट घेतल्यास आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी दिला आहे.