ताज्या बातम्या

संस्कार प्राथमिक शाळेची विद्यानगर विभागातील न भुतो , न भविष्यति स्नेहसंमेलन संपन्न


संस्कार प्राथमिक शाळेची विद्यानगर विभागातील न भुतो , न भविष्यति स्नेहसंमेलन संपन्न

विद्यार्थ्यांनी मुंबई व पुणे दर्जातील सांस्कृतिक कलाविष्कार सादर केला

परळी (प्रतिनिधी):- शहरातील संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर विभागातील शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दि.०४/०२/ २०२३ वार शनिवार रोजी न भुतो , न भविष्यति ,भव्य दिव्य रंगमंचावर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतावर नृत्य सादर करून आगळावेगळा कलाविष्कार सादर केला. बीड जिल्ह्यात कोणत्या शाळेत असे स्नेहसंमेलन झाले नसेल असे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतामुळे प्रेक्षक अक्षरशा भारावून गेले होते.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन विष्णू आव्हाड साहेब कक्ष अधिकारी ,आरोग्य विभाग , मंत्रालय मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष परळी पोलीस स्टेशनचे एपीआय भार्गव सपकाळ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आशिष अंधारे साहेब सचिव के. एस .एम. महाविद्यालय परभणी, डॉ. रावजी सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी परभणी,प्रा. उमेश पतंगराव संचालक मानसी स्किल इन्स्टिट्यूट , शाळेचे मुख्याध्यापक अनकाडे सर यांची उपस्थिती होती.
स्नेहसंमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आली. फिल्म स्टुडिओ सारखा, मुंबई -पुण्याच्या धर्तीवर भव्य दिव्य रंगमंच, झगमगटुन टाकणारा प्रकाश, उत्कृष्ट संगीत व्यवस्था भारतीय संस्कृतीची वारसा सांगणारी गीते, देशभक्तीपर गीतांचे मैफिल , पोशाखांची रंग संगती या स्नेह संमेलनात उपस्थितांना पाहायला मिळाली. यावेळी,विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विविध स्वागतपर गाण्यावर नृत्य सादर केले
आदिसह मराठमोळ्या लावण्या, लोकगीते, हिंदी गीते, आदिवासी गीते,पारंपारिक वेशभूषेत नृत्य अविष्कार सादर केला. यामुळे प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. अनेकांनी सादर केलेल्या गाण्याला टाळ्यांच्या प्रतिसादात दाद दिली.
टीप…टीप…पाणी या गीतावरचे नृत्यात पाण्याचे शहारे हुबेहूब उपस्थितांनी पाहिले.यावेळी भरभरून गाण्याला प्रतिसाद देत अनेकांच्या ओठांवर गीत गुणगुणू लागले.यावेळी विद्यार्थ्या समवेत पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे उपस्थित होते. स्नेहसंमेलन फेसबुक लाईव्ह केले असताना, २४ तासांमध्ये १० हजार लाईक आल्या होत्या. या भव्यदिव्य स्नेहसंमेलनाची चर्चा उपस्थित त्यामध्ये यावेळी दिसत होती. उद्घाटन प्रसंगी बोलताना उद्घाटक विष्णू आव्हाड साहेब म्हणाले की, हा भव्य दिव्य रंगमंच पाहून, पुणे मुंबई सारख्या महानगरात सुद्धा असा भव्य दिव्य रंगमंच विद्यार्थ्यांना उपलब्ध नसतो मात्र, पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे यांनी परळी सारख्या शहरात भव्य- दिव्य रंगमंच उभारून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उभे केले आहे. खर तर त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. असे यावेळी ते उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हणाले.
स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलन विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक आदि मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button