संतशिरोमणी संत रविदासजी महाराज यांची जयंती लिंबागणेश ग्रामपंचायत मध्ये साजरी
१५ व्या शतकातील सुप्रसिद्ध संत, तत्वज्ञ, कवी, समाजसुधारक, देवभक्त संत रविदास यांची ६४७ वी जयंती आज दि.०५ फेब्रुवारी रविवार रोजी लिंबागणेश ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच बाळासाहेब जाधव,प्रमुख पाहुणे तलाठी गणपत पोतदार, ग्रांमपंचायत सदस्य समीर शेख, अक्षयवाणी, रमेश गायकवाड, अर्जुनघोलप, अशोक जाधव, महादेव कुदळे ,दामु थोरात,बाळुकाका थोरात,जीवन मुळे, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष विक्रांत वाणी, संतोष वाणी, चंद्रकांत आवसरे, बबनआवसरे,पांडुरंग वाणी, अड. गणेश वाणी,दादासाहेब वाणी आदि उपस्थित होते. संत रोहिदास यांच्या जीवनकार्याची माहिती प्रमुख वक्ते लेहनाजी गायकवाड सर यांनी दिली, प्रस्तावित अशोक जाधव यांनी तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.गणेश ढवळे यांनी केले तर आभार समीर शेख यांनी मांनले.
गरीब चर्मकार कुटुंबात जन्मलेल्या रविदासांना बालपणापासूनच जातीय व्यवस्थेचे चटके सहन करावे लागले. जातीपातीमध्ये विभागल्या गेलेल्या समाजाला एकमेकांच्या सुत्रात बांधुन स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.
सामाजिक व जातीय सलोख्यासाठी संपुर्ण भारतभर प्रवास ;विविध नावाने ओळख
__
संत रविदास हे भारतातील एकमेव असे संत आहेत ज्यांना संपुर्ण भारतात विविध नावांनी ओळखल्या जाते त्यांची स्मारके, पुतळे, त्यांच्या नावावर धर्मशाळा बांधलेल्या आहेत उत्तरप्रेशात रविदास, महाराष्ट्रात रोहीदास, पंजाबमध्ये रैदास, बंगालमध्ये रईदास, उत्तरेकडील हिंदी भारतीय प्रांतामध्ये रायदास अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. भारताला अध्यात्मिक, सामाजिक व नैतिक उंचीवर नेण्याचे महान कार्य त्यांनी केले. सामाजिक आणि जातीय सलोखा निर्माण व्हावा यांसाठी संपुर्ण भारतभर प्रवास करत प्रचार व प्रसार केला.