क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

16 वर्षीय मुलाने बलात्कारानंतर 58 वर्षीय महिलेची केली निर्घृण हत्या


भोपाळ : एका 16 वर्षांच्या मुलाने 58 वर्षीय महिलेची बलात्कारानंतर निर्घृण हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी रविवारी याबाबतची माहिती दिली.

कैलासपुरी गावात ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या कुटुंबियांकडून दोन वर्षांपूर्वी आरोपी मुलावर फोन चोरल्याचा आरोपही करण्यात आला होता. मुलाला त्याचाच बदला घ्यायचा होता. पोलिसांनी म्हटलं की आरोपीने महिलेच्या तोंडात एक प्लास्टिकचा कागद आणि कापड कोंबलं होतं.

तसंच तिला ओढत एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या भागात नेलं. त्याच ठिकाणी महिला राहत होती. महिलेच्या डोक्यावर आणि शरिरातील इतर भागावर वार केले होते. तसंच प्रायव्हेट पार्टला दुखापत केली होती.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक लाल यांनी सांगितले की, एक फेब्रुवारीला याबाबत माहिती मिळाली होती की बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत ५८ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम तेव्हा घटनास्थळी दाखल झाली होती. महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं होतं. खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि चौकशीच्या आधारावर पोलिसांना पीडित महिलेच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने हत्या केल्याचं समोर आलं.

महिलेच्या कुटुंबियांनीसुद्धा आरोपी मुलावर संशय व्यक्त केला. आरोपी मुलावर दोन वर्षांपूर्वी मोबाईल चोरल्याचा आरोप होता. त्यामुळे मुलगा आणि महिलेच्या कुटुंबात वैर होते. ३० जानेवारीला जेव्हा पीडितेचा मुलगा आणि पती बाहेर होते तेव्हा आरोपी मुलगा घरात जबरदस्तीने घुसला.

तेव्हा महिलेसोबत त्याचा वादही झाला. ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने प्लास्टिक कागद आणि कापड तिच्या तोंडात कोंबल्याचंही पोलिस म्हणाले.

महिलेच्या तोंडावर दोरी आणि तारेने एक प्लास्टिकचा कागद बांधला. त्यानंतर महिलेला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले.

महिलेला दरवाजाला बांधून तिला मारहाण केली आणि बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आरोपीने पीडित महिलेच्या डोक्यात, हातावर, गळ्यावर आणि छातीवर वार केले. याशिवाय त्याने महिलेच्या घरातील काही दागिने आणि रोख रक्कमही लंपास केली. मुलाला ताब्यात घेतल्यानतंर त्याने गुन्हा मान्य केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. त्याच्यावर कलम 302 आणि कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button