भगवान विद्यालयात ग्रंथपाल श्री संपत वारे यांची सेवापुर्ती
भगवान विद्यालयात ग्रंथपाल श्री संपत वारे यांची सेवापुर्ती
बीड(प्रतिनिधी) :- भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये प्रदीर्घ अशी 37 वर्षे सेवा देत ग्रंथपाल श्री संपत सोपानराव वारे आज 31जानेवारी 20023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त संस्था व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गो.गो.मिसाळ सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून सचिन डॉक्टर श्री अनिलकुमार सानप सर उपस्थित होते. ज्येष्ठ संचालक श्री अण्णासाहेब जायभाये व संचालक श्री सत्यस्येन मिसाळ यांची प्रमुख उपस्थित होती.
प्रारंभी कै.गुरुवर्य भा.वा. सानप सर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव मिसाळ सर यांनी प्रास्ताविक केले. सत्कार मूर्ती श्री संपत वारे व सौ अनिता वारे या उभयतांचा संस्था व विद्यालयाद्वारे संपूर्ण कपड्यांचा आहेर देऊन , शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती श्री संपत वारे यांनी आपल्या जीवनातील अनेक घटना यावेळी व्यक्त केल्या. श्री संपत वारे म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा शब्दात सचिव डॉक्टर अनिलभाऊ सानप यांनी आपल्या भावना व्यक्त करून मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपातून श्री गो.गो मिसाळ सरांनी संस्थेचे विश्वसनीय व्यक्तीमत्व म्हणजे श्री संपत वारे अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री डी.पी.डोळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्री एस.पी.गर्जे यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री वासुदेवराव येवले सर ,उपप्राचार्य श्री बबन बडदे सर , श्री राजेंद्रजी ढाकणे सर, कमलाकर वारे ,अंकुश वारे,उत्तम राठोड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद उपस्थित होते. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.