नागनाथ विद्यालय नागतळा येथे गट अभ्यास उपक्रमाची सुरुवात
नागनाथ विद्यालय नागतळा येथे गट अभ्यास उपक्रमाची सुरुवात
प्राचार्य डॉ डी बी राऊत यांनी केले ग्रामीण भागात अभ्यासिका वर्ग सुरू
आष्टी प्रतिनिधी
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागतळा येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यास करणे सोपे व्हावे या उद्देशाने प्राचार्य डॉ. डी. बी. राऊत यांच्या संकल्पनेतून (ग्रुप स्टडी) “गट अभ्यासिका उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत 5 वी ते 12 वी वर्गातील विद्यार्थी यांच्या संख्येनुसार 4 ते 5 विद्यार्थांचा प्रत्येकी एक गट बनविण्यात आला आहे असे प्रत्येक वर्ग निहाय एकूण आठ ते बारा गट तयार करण्यात आले आहेत
सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.30 ते 10:00 असे विषयनिहाय ‘5 वी ते 12 वी वर्गांचे “गट नियोजन बनविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शंका निरसन, त्यांना मार्गदर्शन त्यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विषयाच्या वेळापत्रकानुसार विषय शिक्षकाची नेमणूक केलेली आहे. विशेषतः पुढील महिन्यात होणाऱ्या
१० वी व १२ वी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यासाठी (ग्रुप स्टडी) गट अभ्यास हा उपक्रम, परीक्षेच्या तयारीसाठी अधिक उपयुक्त ठरत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्राचार्य डॉ डी. बी. राऊत यांनी सुरु केलेला उपक्रम नवसंजीवनी ठरत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी आपल्या गटातील विद्यार्थ्याकडून योग्य मार्गदर्शन घेत असून आपल्या समस्या सोडवत आहेत. इंग्रजी, गणित व विज्ञान हे कठीण विषय सहज आणि कार्यक्षमतेने शिकण्यास व समजून घेण्यास प्रत्येक विद्यार्थ्यास मदत होत आहे कठीण संकल्पना समजण्यास मदत होत आहे हुशार मुलांच्या मदतीने अभ्यासतंत्र, स्मरण तंत्र अवगत करत असल्याने परीक्षेची तयारी करणे त्यांना सोपे जात आहे. विद्यार्थी शिस्तीचे पालन करत असल्याने, त्यांची निर्णयक्षमता वाढत आहे. एकमेकांना विद्यार्थी अभ्यास करण्यास प्रेरीत करत असल्याने, ते, सर्वगुणसंपन्न बनत असून, यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. गट अभ्यासामुळे सर्वसमावेश्यकता येत असल्याने, त्यांच्यावर वैयक्तिक जबाबदारी येत आहे . या उपक्रमामुळे 5 वी ते 12 वी वर्गातील विद्यार्थी सकाळी 9. 15 वाजता शाळेच्या प्रांगणात उपस्थित राहत आहेत. व त्याच्यात अभ्यासाची आवड निर्मााण होत आहे या उपक्रमाबद्दल प्राचार्य डॉ. डी.बी. राऊत , त्यांचे सहशिक्षक बी वाय शिंदे, प्रा. सुरेश औटे, प्रा. आश्रुबा भोराडे , प्रा. राम बनसोडे, प्रा. आर बी. तळेकर, एस पी गदादे, श्री. डी.टी. शिंदे, श्री एस एल घुमरे, श्री जी के दळवी, श्री एस. आर. राऊत, श्री पी के गर्जे यांनी गट अभ्यास हा अभिनव उपक्रम नागतळा ग्रामीण परिसरातील नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू केल्याबद्दल विशेष कौतुक होत आहे या उपक्रमाला विद्यार्थी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.