ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड पाणी गरम करताना हिटरचा शॉक लागला, पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू


 थंडीचे दिवस आहेत आणि त्यातच महावितरणचा सावळा गोंधळ केज परिसरात काही गावात पहाटेच्या पाच वाजेच्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. त्याआधीच शेतात जाण्यासाठी ज्ञानेश्वर सुरवसे हे चार वाजता आंघोळीसाठी उठले, यावेळी पत्नी झोपत होती.

ज्ञानेश्वर यांनी स्वतः फिटरची पिन बोर्डाला लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना विद्युत शॉक लागला आणि ते ओरडू लागले. पतीचा ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नीला जाग आली आणि तिने पतीकडे धाव घेतली.

बीड : अंघोळीचं पाणी गरम करताना वीजेचा शॉक लागून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. पतीला शॉक लागला म्हणून वाचवायला गेलेल्या पत्नीचाही शॉक लागून मृत्यू झाला.

केज तालुक्यातील पिंपळगाव येथे ही घटना घडली. ज्ञानेश्वर सुरवसे आणि इंदूबाई सुरवसे असे मयत पती-पत्नीचे नाव आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ज्ञानेश्वर सुरवसे आणि इंदूबाई सुरवसे हे नेहमीप्रमाणे बुधावरी पहाटे 4 वाजता उठले. मग अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी हिटर चालू करण्यासाठी गेले. हिटर चालू करत असताना त्यांना वीजेचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button