What is Black Magic : काळी जादू म्हणजे काय? आजही अनेक लोक अंधश्रद्धेच्या विळख्यात..
सध्या जग आधुनिकतेच्या शिखरावर आहे. विज्ञान (Science), तंत्रज्ञान (Technology) युगात नवनवीन शोध लागले आहेत.
त्यामुळे मानवाचं जीवन अधिक सुखकर झाले आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. लोक देशविदेशात जाऊन विविध विषयांचा अभ्यास करताना दिसत आहेत. असे असले तरी आजही अनेक लोक अंधश्रद्धेच्या विळख्यात (Black Magic) अडकले आहेत. अनेक लोक सध्याच्या या आधुनिक जगातही काळी जादू सारख्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत. गंभीर बाब म्हणजे उच्च शिक्षित लोकही अंधश्रद्धेमध्ये अडकल्याचे पाहायला मिळत आहे. एका संशोधनानुसार, जुन्या काळात लोक काळ्या जादूवर विश्वास ठेवायचे त्याहूनही अधिक लोक सध्याच्या या विज्ञान युगात यावर विश्वास ठेवतात.
What is Black Magic : काळी जादू म्हणजे काय?
संशोधनानुसार, काळी जादू म्हणजे एक अशी कला किंवा विद्या ज्याद्वारे एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नुकसान पोहोचवू शकते, असे मानले जाते. फक्त भारतातच नाहीतर जगभरात काळी जादू प्रचलित आहे. भारतासह संपूर्ण जगात असे अनेक तांत्रिक आहेत जे या विद्याचा वापर करतात आणि त्याचा अभ्यास करतात. मात्र, काळी जादू उघडपणे करत नाहीत, तर सर्वांच्या नजरेतून छुप्या पद्धतीने केली जाते. भूतबाधा, वशिकरण आणि अशा अनेक गोष्टी या काळ्या जादूमध्ये येतात.
लोक काळ्या जादूवर विश्वास ठेवतात?
वॉशिंग्टन विद्यापिठातील अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ बोरिस ग्रेशमन यांना एका संशोधनात असे आढळून आले आहे की, आज जगात काळ्या जादूवर खूप विश्वास ठेवला जातो. जुन्या काळातील लोक काळ्या जादूवर विश्वास ठेवत होते, त्यापेक्षा अधिक लोक सध्या यावर विश्वास ठेवतात. या संशोधनादरम्यान, बोरिस ग्रेशमन यांनी 95 देश आणि प्रदेशांमधून मोठ्या प्रमाणात माहिती गोळा केली. या संशोधनामध्ये 1.4 लाख लोकांचा समावेश होता. या सर्वांपैकी 40 टक्के लोकांचा काळ्या जादूवर विश्वास आहे. या लोकांनी सांगितले की, ते काळ्या जादूवर विश्वास ठेवतात आणि काळी जादू खरे असल्याचे मानतात. त्यांचा विश्वास आहे की काळ्या जादूचा त्यांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.
काळ्या जादूवर किती जणांचा विश्वास?
काळ्या जादूच्या बाबतील प्रत्येक देशाचे आणि तेथे राहणाऱ्या लोकांचे मत वेगळे असल्याचे या संशोधनात आढळून आले. भारतातही गेल्या काही काळात अंधश्रद्धा आणि त्यासंबधित गुन्हे समोर आले आहेत. काही देशांमध्ये खूप कमी लोकांचा यावर विश्वास होता, तर काही देशामध्ये खूप जास्त लोकाचा विश्वास होता. काही देशांमध्ये 10 टक्क्याहून कमी लोक काळी जादूला मानतात. पण, असेह काही देश आहेत जिथे संशोधनात सहभागी झालेल्या 90 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांचा या काळ्या जादूवर आणि त्याच्या परिणामांवर विश्वास आहे.
‘या’ देशातील लोकांचा काळ्या जादूवर अधिक विश्वास
या संशोधनात सहभागी झालेल्या स्वीडिश नागरिकांना विचारले असता, त्यांच्यामध्ये काळ्या जादूवर विश्वास ठेवण्याचे प्रमाण खूप कमी होते. केवळ 9 टक्के स्वीडिश नागरिकांचा काळ्या जादूवर विश्वास होता. याउलट संशोधनात सहभागी असलेल्या ट्युनिशियातील 90 टक्के लोकांनी काळ्या जादूवर विश्वास असल्याचे सांगितले
वरील मचकूर माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोकशाही न्युज कोणताही दावा करत नाही.