राज्यातील शेतकरी बांधवांचे अनुदान ग्रामपंचायत मार्फत वाटप करा – प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर
राज्यातील शेतकरी बांधवांचे अनुदान ग्रामपंचायत मार्फत वाटप करा – प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर
______________
बीड : राज्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देऊन दिवाळी गोड करू असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन फोल ठरले सदरील नुकसान भरपाई हे अनुदान थेट सरपंच उपसरपंच से.स.सो सेक्रेटरी, चेअरमन, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, यांची कमिटी स्थापन करून थेट ग्रामपंचायतच्या अकाउंट मध्ये जमा करण्याची मागणी रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जेणेकरून सर्वसामान्य वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग, अपाक, खातेदारांना त्रास होणार नाही. तसेच बँक खात्यात जमा केले तर या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर या सदरील नागरिकांना बँक मध्ये जाण्याचा त्रास देखील गंभीर ठरतो. व गेल्यानंतर अधिकारी, कर्मचारी हे देखील बरोबर देखभाल करीत नसल्याचे दिसून येते, या अनुषंगाने रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी सदरील शेतकरी बांधवांचा अनुदान तात्काळ ग्रामपंचायत च्या अकाउंट मध्ये जमा करावे नसता 26 जानेवारी रोजी उग्र आंदोलन करणार अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री साहेब यांचेकडे केली आहे.