ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

पंचगंगा नदीत मृत माशांचा खच, तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पंचनामा


कोल्हापूर : कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसंदर्भातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा दिखाऊपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वी जलपर्णीने व्यापून जाणाऱया नदीपात्रात आता मृत माशांचा खच तरंगताना दिसत आहे.
सुर्वे बंधाऱयात गेल्या तीन-चार दिवसांपासून मृत माशांचा खच तसाच पडून राहिल्याने मासे कुजून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या तक्रारीनंतर जाग आलेल्या प्रदूषण नियंत्रण महामंडळने नेहमीप्रमाणे पंचनाम्यासह दूषित पाण्याचे नमुने घेण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत.



प्रदूषणामुळे पंचगंगा नदी नेहमीच चर्चेत राहिली आहे. यापूर्वी प्रदूषणामुळे नदीला जलपर्णीचा विळखा दिसून येत होता. मात्र, आता तर यातील जलचरांवर विपरीत परिणाम होताना दिसून येऊ लागला आहे. यापूर्वीही नदीपात्रात प्रदूषणामुळे मासे मृत होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा वेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून केवळ पंचनामे आणि दूषित पाण्याचे नमुने घेण्याचे काम करण्यात आले, तर राज्य शासनासह जिह्यातील लोकप्रतिनिधींकडून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसंदर्भात केवळ आराखडे सादर करून दिखावेच करण्यात आल्याचे आता पुन्हा एकदा दिसून येऊ लागले आहे.

राजाराम बंधारा, तसेच पुढे शिये पुलापर्यंत हजारो मासे ऑक्सिजनसाठी पाण्यात तडफडताना दिसून येत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर गांधीनगर, निगडेवाडी, वळिवडे घाट परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. तरीसुद्धा प्रशासनाला यांचे गांभीर्य नसल्याचे आज दिसून आले.

प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी या घाट परिसराची पाहणी करून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जागेवर जाऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी पाण्याला आलेला हिरवा रंग, मृत माशांमुळे असलेली दुर्गंधी, तसेच या नदीत गांधीनगरसह गावांतील सांडपाणी वाहून येणाऱया नाल्याच्या दूषित पाण्याचेही नमुने घेण्यात आले. नदीप्रदूषणाला सुर्वे बंधाऱयाच्या वरच्या बाजूला एका साखर कारखाना असल्याचीही नोंद पाहणीतून करण्यात आली आहे. या पंचनाम्यावेळी वळिवडे गावच्या सरपंच रुपाली कुसाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

…तर जिल्हाधिकारी, सीईओ जबाबदार – दिलीप देसाई

पंचगंगा प्रदूषणासंदर्भात आजवर अनेक आंदोलने झाली, न्यायालयात दावे झाले, तरीसुद्धा नदीचे प्रदूषण थांबले नाही. अनेक कारखाने, नाल्यांद्वारे मिसळणाऱया दूषित पाण्यामुळे नदीची ‘गटारगंगा’ झाली आहे. आता पुन्हा नदीप्रदूषणामुळे सुर्वे बंधारा येथे मृत माशांचा खच तरंगताना दिसत आहे. तीन-चार दिवसांपासून हे मृत मासे तसेच नदीपात्रात राहिल्याने ते कुजले आहेत. या मृत माशांना बाहेर काढून त्यांची शास्त्र्ााrय पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र, याकडेही प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. हे मृत व कुजलेले मासे त्वरित काढले नाहीत, तर त्याचे विष होईल. असे विषयुक्त पाणी जनावरांसह आसपासच्या नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे. यातून एक जरी जनावर वा व्यक्ती दगावली, तर त्याला जिल्हाधिकारी, तसेच जिल्ह परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीच जबाबदार राहतील, असा इशारा प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी दिला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button