लोकनेते आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या संकल्पनेतून अनेक वर्षांपासून सुरू आसलेल्या व्यसन मुक्ती जनजागृती महारॅलीस व कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे – पांडुरंग आवारे पाटील
लोकनेते आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या संकल्पनेतून अनेक वर्षांपासून सुरू आसलेल्या व्यसन मुक्ती जनजागृती महारॅलीस व कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे :- पांडुरंग आवारे पाटील
——————————‐————————
बीड : दि.31 डिसेंबर 2022 रोजी कै.आण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, बीड आयोजित व्यसन मुक्ती अभियान अंतर्गत प्रतिवर्षा प्रमाणेच या वर्षी ही व्यसन मुक्ती जनजागृतीसाठी महारॅली दि.31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8.00 वा श्रीमंतयोगी छञपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बीड. ते छञपती शिवाजी महाराज यांना आभिवादन करून
सामाजिक न्याय भवन (डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन)बीड. या ठिकाणा पर्यन्त काढण्यात येणार असून व या महारॅलीचा समारोप कार्यक्रम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन बीड येथे होणार आहे.या रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंञी ना.आ.मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब व ग्रामविकास मंञी ना.गिरीषजी महाजन साहेब, राज्याचे सहकार व बीड चे पालकमंञी ना.अतुलजी सावे साहेब, आणि विभागीय आयुक्त सहनिबंधक सहकारी संस्था लातूर, डाॅ.ज्योतीताई विनायकराव मेटे व अन्य विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर सहभागी होणार आहेत.
लोकनेते आ.विनायकराव मेटे साहेब यांनी लावलेली ज्योत कै.आण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान, बीड आयोजित व्यसन मुक्ती अभियान अंतर्गत व्यसन मुक्ती जन जाग्रती रॅली व दि.31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6.30 ते 9.30 वाजेपर्यंत सुमनांजली कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह बीड येथे होणार असून या दोन्ही ही कार्यक्रमास सर्व घटकातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर पुणे.मा. पांडुरंग आवारे-पाटील यांनी सर्वानाच केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बीड येथे ‘थर्टी फर्स्ट ‘ ला उदात्त सामाजिक दृष्टिकोनातून व्यसन मुक्तीचा कार्यक्रम राबविला जात आहे.या कार्यक्रमाचे प्रणेते स्व.आ.विनायकराव मेटे आहेत हे बीड जिल्ह्याला व राज्याला विदीत आहे.आदरणीय साहेबांच्या संकल्पनेतून दरवर्षी(कोरोनाचा अपवाद वगळता)संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास साहेबांच्या विचारांचा वसा पुढे चालवणाऱ्या समाज घटकांचे उत्तरदायित्व विचारात घेहुन यावर्षी देखील दि.31 डिसेंबर रोजी व्यसन मुक्तीसाठी जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.31 डिसेंबर रोजी ‘थर्टी फर्स्ट ‘च्या नावाखाली डर्टी मुहूर्त साधत नवयुवक व्यासनाला सुरवात करतात. तरुणांनी व्यसनांच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या पुढाकारातून मराठवाडा लोक विकास मंच,सामाजिक न्याय विभाग व कै.आण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान व शिवसंग्राम च्या वतीने व्यसनमुक्ती संगीत रजनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मागील आनेक वर्षांपासून केले जायचे यात जनजागृती रॅली, मॅरेथॉन स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत रजनी, सांस्कृतिक कार्यक्रमात प्रबोधन,मनोरंजन, हास्य विनोदासह अनेक कार्यक्रमातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्याचे काम केले जात होते.मात्र लोकनेते आ.विनायकराव मेटे साहेब हे मराठा आरक्षणाच्या मुंबई येथील मिटींग ला जात आसताना त्यांचा दुर्दैवी अपघाती दुखंत निधनानंतर व्यसनमुक्तीच्या चळवळीला खंड पडणार की काय अशी चर्चा सुरू आसतांना कै.आण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आ.विनायकराव मेटे साहेब यांनी लावलेली ज्योत शिवसंग्राम च्या व डाॅ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या माध्यमातून पुढे घेऊन जाणार आसल्याचे शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर पुणे.मा.पांडुरंग आवारे-पाटील यांनी म्हटले आहे. म्हणून समाज हिताच्या व्यसनमुक्ती जनजागृती महारॅलीस व सुमनांजली कार्यक्रमास सर्वानीच उपस्थित राहावे.