चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळुन “मानवी हक्क दिवस “साजरा
महापुरूषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणा-या चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळुन “मानवी हक्क दिवस “साजरा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
सर्वसामान्याला शिक्षणाचा हक्क मिळावा, शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरीब ,दिन-दलितांच्या घरापर्यंत पोहचवणा-या महात्मा फुले ,भारतरत्न आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भिक मागितली असे महापुरूषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणा-या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज दि.१० डिसेंबर शनिवार रोजी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश बसस्थानक येथे चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्यांचा पुतळा जाळुन निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सर्पमित्र अशोक जाधव,शेख समीर, लेनाजी गायकवाड,,बाळासाहेब मुळे, विक्की वाणी,स्वप्नील निर्मळ, जितु निर्मळ,संदिप आवसरे, स्वप्नील वक्ते,तेजस काटे,सय्यद अख्तर, औदुंबर नाईकवाडे,विक्की जाधव,बालाजी निर्मळ,आरूण निर्मळ,पंजाब अंकुशे,शहादेव थोरात
उपस्थित होते.
पैठण येथे आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शैक्षणिक संस्थांनी सरकारी अनुदानावर अवलंबून राहु नये खाजगी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांनी निधी उभारावा असे नमूद करताना महात्मा फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भिक मागुन शाळा सुरू केल्या असे वादग्रस्त विधान करून महापुरूष आणि महाराष्ट्राचा सुद्धा अवमान केला असून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शिक्षणाचा आधिकार; मुलभुत मानवी हक्क तोच नाकारण्याचे षडयंत्र
___
जगभरात “आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस “म्हणून संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या (UNHRO) नेतृत्वात ” १० डिसेंबर” साजरा करण्यात येतो. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरीस येथे स्विकारल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने १९५० मध्ये १० डिसेंबर हा दिवस मानवाधिकार दिवस म्हणून घोषित केला. मुलभुत मानवी हक्कामध्ये शिक्षणाचा आधिकार समावेश असून बहुजण दलित पददलितांना शिक्षणाची दारे उघडणा-या बहुजण नायकांचा अपमान करणारे आणि “शिक्षणाचे खाजगीकरण “करून या वर्गाला शिक्षणाची दारे पुन्हा बंद करण्याच्या धोरणाचा पुरस्कार करत षडयंत्र रचणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२