भूकंपाचे नऊ धक्के दहावा धक्का किल्लारी आणि हासोरी भागात
लातूर : लातूर जिल्ह्यातील हासोरी भागात पुन्हा भूकंपाचा एक धक्का जाणवला आहे. 16 सप्टेंबर ते आजपर्यंत नऊ धक्के जाणवले असून दहावा धक्का किल्लारी आणि हासोरी भागात 2.4 रिश्टर स्केलचा धक्का शुक्रवारी रात्री दोन वाजून दहा मिनिटाला जाणवला आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी हासोरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
याआधी येथे 16, 25, 26 आणि 29 सप्टेंबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर 4, 9, 11 ऑक्टोबर रोजी आणि आता 19 नोव्हेंबर मध्यरात्री धक्का जाणवला आहे. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. या धक्क्यामुळे 1993 मध्ये झालेल्या भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. औसा तालुक्यातील किल्लारी परिसरातील 5 किलोमीटरचा परिसर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहार तालुक्यातील काही गावांना हा धक्का जाणवला आहे, अशी माहिती भूकंप वेधशाळा अधिकारी किशोर सिंग परदेशी यांनी दिली आहे. लातूरच्या भूकंपमापन केंद्रापासून 49 किलोमीटर ते 59 किलोमीटर अंतरावरील भागामध्ये या भूकंपाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी हे गाव गणेश आगमनाच्या पूर्वीपासूनच त्रस्त आहे. कारण या गावात सतत जमिनीतून आवाज येत होते. ग्रामस्थांनी वेळोवेळी याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. ग्रामस्थांच्या मतानुसार हे भूकंपाचे धक्के होते. मात्र प्रशासनाने भूगर्भातील हालचालीमुळे जमिनीतून आवाज येत आहे, असं सांगत ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. प्रशासकीय पातळीवर यंत्रणा हलली. अनेक पथकांनी हासोरी या गावाला भेटी दिल्या. दिल्ली येथील पथक देखील येथे आले होते. याच काळात या भागात पुन्हा एकदा धक्के जाणवले. 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी दुसऱ्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. भूगर्भातील ते आवाज म्हणजे भूकंपच होते, हे पत्रकार परिषद झाल्यानंतर समोर आले. त्यानंतर आवाजाची आणि धक्क्याची मालिका काही काळ सुरूच होती.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या