खामगाव येथील आदर्श लॉजमध्ये एका प्रेमीयुगुलाची आत्महत्या
बुलडाणा : बुलडाण्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात जिल्ह्यातील खामगाव येथील आदर्श लॉजमध्ये एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे दोघांनी एकाच दोराला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दोघंही खामगावमधील आदर्श लॉजवर थांबले होते.
याच ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शीतल तायडे असं युवतीचं नाव असून विकास सावळे असं युवकाचं नाव आहे. या घटनेतील युवती ही अगोदरच विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या