कांदा घेऊन जात असलेला पिकअप टायर फुटल्याने पलटी
सोलापूर : मोहोळजवळील कोळेगाव हद्दीत कांदा घेऊन जात असलेला पिकअप टायर फुटल्याने पलटी झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळजवळील कोळेगाव हद्दीत घडली.
या अपघातात दत्तात्रय भानुदास शेळके (५५), श्रीमंतसिंग धोडिंराम परदेशी (५०), नितीन बजगे (वय ३५) या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मयत शेतकरी हे मंगळवारी रात्री शेतातून कांदा घेऊन सोलापूर येथील बाजार समितीत लिलाव करण्यासाठी आणत होते. पहाटेच्या सुमारास वेगात असलेल्या पिकअपचे टायर अचानक फुटले. त्यानंतर पिकअप पलटी झाला.
पलटी झाल्यानंतर गाडीत बसलेले शेतकरी फेकले गेले, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती, त्यातच दोघांचा जागीच तर एकाचा उपचारा दरम्यान शासकीय रूग्णालय, सोलापूर येथे मृत्यू झाला. अपघातानंतर मोहोळचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद मोहोळ व शासकीय रूग्णालयातील पोलिस चौकीत झाली आहे. या अपघातानंतर रस्त्यावर कांद्यांचे पोतेच पोते पडले होते, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. मात्र वाहतूक शाखेच्या पथकाने काही वेळातच वाहतूक रस्त्यासाठी खुला केला.
हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या