देवस्थान गुलजार मस्जीद इनामी जमीनी प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करा
देवस्थान गुलजार मस्जीद इनामी जमीनी प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करा.
विभागीय आयुक्त कार्यालय समोर बेमुदत अमरण उपोषण.
बीड : मौजे धारुर येथील देवस्थान गुलजार मस्जीद च्या इनामी जमीनी प्रकरणात दोषी अधिकारी व कर्मचान्यांवर तात्काळ कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज दिनांक 09/11/2022 बुधवार रोजी सकाळी 11.00 वा. पासून मा. विभगीय आयुक्त साहेब, आयुक्त कार्यालय समोर औरंगाबाद येथे सय्यद फयाज इनामदार सालाहोद्दिन यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत अमरण • उपोषण करण्यात आले.
असे की, बीड जिल्हयात गेल्या काही वर्षांपासून बोगस बनावट भ्रष्टाचार समित्यांचा व त्यांच्या पदाधिकान्यांचा सुळसुळात माजला असून भ्रष्टाचार समितीच्या नावाखाली देवस्थान इनामी जमीनींचे अवैध प्रकारे अथवा बेकायदेशीर विव्हेवाट लावण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून या संदर्भात वेळोवेळी महसूल प्रशासनाला निवेदने देवुन देखील प्रशासन जागे होत नसून उलट संबंधीत बनावट भ्रष्टाचार समितींना सहकार्य करुन प्रकरण दडण्याचे प्रकार जिल्हाभरात सुरू आहे. असेच प्रकार माजे धारुर येथील देवस्थान गुलजार मस्जीद प्रकरणात घटले आहे.
देवस्थान गुलजार मस्जीद सेवेच्या अटीवर मौजे धारुर येथे इनामी जमीन सर्वे नं. 20 क्षेत्र 21 एकर 106 गुंठे सर्वे नं 69 क्षेत्र 25 एकर 37 गुंठे, सर्वे नं.77 क्षेत्र 23 एकर 08 गुंठे आहे सदरील देवस्थान जमीन मुन्तखव क्र. 1166 अन्वये माझे पंजोबा सय्यद निजोमोद्दिन पि. सय्यद कादर व सय्यद तकी पिता सय्यद कादर यांच्या नावाने नमुद देवस्थान जमीन सेवेच्या अटीवर खिदमत बहाल करण्यात आली होती.. वरील देवस्थान जमीनीची देखभाल व सेवा करत वहीती माझा कुटूंब करीत होते. माझे अजोबा सय्यद खेरोद्दिन पि. सय्यद रुकनोद्दिन यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ व उप विभागीय अधिकारी कार्यालय, माजलगाव यांच्या अंतर्गत दि.23/06/2016 रोजी विरासत प्रलंबित असतांना ते मयत झाले होते. त्यामुळे माझे वडिल सय्यद सलाहोद्दिन पि. सय्यद खेरोद्दिन यांनी विरासत मंजूर होण्या करीता मा.उपजिल्हाधिकारी (अतियात) माजलगांव यांच्या न्याय प्रविष्ठात दि. 29/09/2016 रोजी अर्ज दाखल केले आहे. व सद्यास्थितीत सदरील अर्ज हा प्रलंबित आहे.
तरी सय्यद सादेक सय्यद बाबामियाँ भ्रष्टाचार निर्मूलन अभियान समितीच्या मराठवाडा अध्यक्ष पदावर असल्याचा गैर वापर करुन अप्पर जिल्हाधिकारी अंबाजोगाई, उप जिल्हाधिकारी माजलगाव, धारूर तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी यांच्या संगणमताने वरील विरासत अर्ज दळवण्याचे काम केले आहे. वरील देवस्थान गुलजार मस्जीद प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी मा. आयुक्त कार्यालय समोर आज औरंगाबाद येथे सय्यद फयाज इनामदार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत अमरण उपोषण करण्यात आले यावेळी हारून इनामदार,फाहाद चाऊस, सय्यद रेहान, अर्शद खान, शेख कमेल,व इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !