व्हिडिओ न्युज

Video बोगद्याचा काही भाग कोसळळून १४ दिवसांपासून ४१ मजूर आत,मशीन झालं खराब


उत्तराखंडमध्ये उत्तरकाशीत सिलक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळळून १४ दिवसांपासून ४१ मजूर आत अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.



मात्र आतापर्यंत अनेकदा या बचावकार्यात अडथळे आले. आता या मजुरांना बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचं साधन ठरत असलेलं अमेरिकन ऑगर मशिन नादुरुस्त झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे बचावकार्याला मोठा धक्का बसला आहे.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ असलेल्या अर्नोल्ड डिक्स यांनी शनिवारी सांगितलं की,” बोगद्यात ऑगर मशिनने ड्रिल केलं जात होतं. त्यावेळी मशिन खराब झाले आहे.” बचावकार्याचा १४वा दिवस आहे आणि लवकरच मजूरांना बाहेर काढण्यात यश येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र ऑगर मशीन नादुरुस्त झाल्याने आणखी काही काळ वाट बघावी लागेल.

अमेरिकन टनल एक्सपर्ट अर्नोल्ड डिक्स यांनी म्हटलं की, “ऑगर तुटलं आहे आणि नादुरुस्त झालं आहे. आम्ही जो कोणता पर्याय वापरत आहोत त्याचे काही फायदे आणि तोटेही आहेत. आम्ही बचावपथक आणि मजूर यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काम करत आहोत.” बचावकार्य सुरु झाल्यापासून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

सिलक्यारा बोगदा हा चारधाम यात्रेच्या मार्गावर तयार केला जात आहे. १२ नोव्हेंबर रोजी या बोगद्याचा काही भाग कोसळला. त्यानंतर ४१ मजूर आत अडकले. बचावकार्यासाठी वेगवेगळ्या संस्था युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. ५० मीटरपर्यंत ड्रिलिंग झाले असून अवघ्या १० मीटर अंतराचे ड्रिलिंग शिल्लक राहिले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button