आरे कॉलनीत मगर परीसरात खळबळ !
मुंबई : आरे कॉलनीत मंगळवारी दुपारी एक मगर पकडण्यात आली. मंगळवारी दुपारी आरे कॉलनीतील युनिट क्र. 31 जवळ ही मगर पकडण्यात आली होती.
मादी जातीची मगर असल्याचंही समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच बिबट्यालाही (Aarey Colony Leopard) आरे कॉलनीत जेरबंद करण्यात यश आलं होतं. न्यूझीलंड हॉस्टेलजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्या बिबट्या अडकला होता. ही घटना ताजी असताना आता मगरीलाही पकडण्यात आलं आहे. त्यामुळे आरे कॉलनीतील जंगली प्राण्यांचा वावर पुन्हा चर्चेत आला आहे.
ही घटना घडून काही दिवस उलटले असतानाचा आता तर चक्क मगर आरे कॉलनीत आढळून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. आरे कॉलनीच्या आंबावाडी इथं चंदन चव्हाण नावाच्या इसमाला जंगलातील एका नाल्यात मगर असल्याचं आढळून आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, चंदन चव्हाण यांना नाल्यात काहीतरी हालचाल होत असल्याचं दिसलं. मासा असल्याचं समजून त्यांनी जाळं त्या ठिकाणी जाळं टाकलं. पण जेव्हा जाळ्यात अडकलेला प्राणी त्यांनी पाहिला, तेव्हा हकीकत समोर आली.
मगर जाळ्यात अडकल्याचं पाहून चंदन चव्हाण यांनी तातडीने वन विभागाच्या पथकाला कळवलं. वन्यप्रेमींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मगरीला रेस्क्यू केलं. वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनचे रवी जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली या मगरीचा पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. यावेळी वनविभागाचे सुरेंद्र पाटील हे देखील त्यांच्या सोबत होते.
पकडण्यात आलेली मगर ही दीड वर्षांची असल्याचं समोर आलं आहे. ती 3 फूट 3 इंच लांबीची होती. या मगरीची वैद्यकीय चाचणी करुन नंतर तिला पुन्हा सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !