मुलगी आणि आईचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत परिसरात खळबळ
अमरावती : अमरावती जिल्ह्यात अभियंता मुलगी आणि आईचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अमरावती शहरातील आशियाड कॉलनी परिसरातील संमती शिक्षक कॉलनीत ही घटना घडली आहे. ही घटना रात्री दहाच्या सुमारास समोर आली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुवर्णा वानखेडे (वय 51 वर्षे) आणि मृणाल प्रदीप वानखडे (वय 25 वर्षे) असं मृत आई आणि मुलीचं नाव आहे.
महिलेच्या पतीला अटक
आई आणि मुलीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमधून घरगुती वादातून आई आणि मुलीने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान अभियंता (Engineer) मुलगी मृणालचे वडील प्रदीप वानखेडे हे शिक्षक असून ते यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी इथे एका खाजगी शाळेत कार्यरत आहेत. मंगळवारी (25 ऑक्टोबर) प्रदीप वानखडे हे शेगावला गेले होते.
मृत्युची माहिती पोलिसांना कशी मिळाली?
परिसरातील एका हनुमान मंदिराजवळ काल (25 ऑक्टोबर) सायंकाळी एका व्यक्तीला सोन्याचे दागिने आणि काही रोकड पडल्याची दिसली. त्याने याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांना कळलं की हे दागिने सुवर्णा वानखेडे यांचे आहेत. पोलीस त्यांच्या नातेवाईकांना घेऊन घरी गेले तेव्हा दार बंद असल्याने दार तोडून घरात गेले, तेव्हा त्या माय-लेकीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.