पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना बडतर्फ करण्यासाठी “संविधान बचाव आंदोलन -डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
अनुसुचित जाती-जमाती अंतर्गत सामाजिक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करून कायद्याचा गैरवापर व पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणा-या पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना बडतर्फ करण्यासाठी “संविधान बचाव आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
राजकीय नेते व धनदांडगे यांच्या दबावापोटी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिवर अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अत्याचार (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार कलम ३ (१)(आर),३ (१)(एस) नुसार खोटे गुन्हे दाखल करणे तसेच पोलीस अधिक्षक बीड नंदकुमार ठाकुर आणि अप्पर पोलीस अधीक्षक बीड सुनिल लांजेवार यांच्या आदेशानंतर सुद्धा रामनाथ खोड व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची तक्रार नोंदवून न घेणारे पेठ बीड पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी (अट्रसिटी)कायद्याचा गैरवापर व कायद्याची बदनामी केल्याबद्दल तसेच सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांच्या कुटुंबियावर हल्ला प्रकरणात बोटचेपी भुमिका घेऊन पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल पेठ बीड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना बडतर्फ करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच पारदर्शी तपास होण्यासाठी प्रामाणिक आधिका-यांकडे वर्ग करण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२१ ऑक्टोबर शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी संविधान बचाव आंदोलन करण्यात आले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांना देण्यात आले.यावेळी आंदोलनात बीड जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती,बीड शेख युनुस च-हाटकर,तालुकाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती शेख मुस्ताक, शेख मुबीन बीडकर,शिरूर तालुकाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती अशोक कातखडे,बीड जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी माजी सैनिक अशोक येडे, बीड शहराध्यक्ष आम आदमी पार्टी सय्यद सादेक, सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हासदस्य वंचित बहुजन आघाडी अजय सरवदे, बीड जिल्हाध्यक्ष ऑल इंडीया पॅथर सेना नितिन सोनावणे,जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी बीड ज्ञानेश्वर कवठेकर, जिल्हाध्यक्ष युक्रांद अड.पंडित तुपे ,एआयवायएफ बीड जिल्हाध्यक्ष संजय इंगोले,श्रीकृष्ण उबाळे,संतोष माने,संतोष डोंगरे आदि सहभागी होते.
पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या आदेशाची अवमानना
____
दि.१९ ऑक्टोबर २०२२ बुधवार रोजी दुपारी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रशासक शनिमंदिर देवस्थान यांच्या आई व बहिणीला मारहाण केल्याबद्दल संबधित प्रकरणात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी मी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,रामनाथ खोड व अक्षय रेडे तिघेही अप्पर पोलीस अधीक्षक बीड सुनील लांजेवार तसेच पोलीस अधिक्षक बीड नंदकुमार ठाकुर यांना भेटलो त्यांना सविस्तर घडलेली घटना सांगितली त्यानंतर नंदकुमार ठाकुर तसेच सुनिल लांजेवार यांनी पेठ बीड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक एकनाथ कदम यांना रितसर फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांच्या आदेशाची अवमानना करत पोलीस निरीक्षक एकनाथ कदम यांनी पेठ बीड पोलीस स्टेशन येथे रामनाथ खोड यांची फिर्याद दाखल करून घेतली तर नाहीच उलट त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
अनुसुचित जाती जमाती कायद्याचा गैरवापर व पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल बडतर्फ करा
___
उलट राजकीय दबावापोटी रामनाथ खोड यांच्या कुटुंबियावर अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार ३ (१)(आर) व ३ (१)(एस) नुसार कलम लावण्यात आलेले असुन एकप्रकारे अनुसुचित जाती,जमाती (अत्याचार प्रतिबंधक)कायद्याचा गैरवापर करून कायद्याला बदनाम करत पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल पेठ बीड पोलीस निरीक्षक एकनाथ कदम यांचे तात्त्काळ निलंबन करण्यात यावेत तसेच पारदर्शकपणे तपास करणा-या प्रामाणिक आधिका-यांकडे तपास सोपवावा.अशी मागणी करण्यात आली आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२