पंकजा मुंडेनी छोटया हाॅटेलमध्ये मिसळ पावचा आस्वाद घेत स्वतः चहाही तयार केला
पंकजा मुंडे आज सकाळी औरंगाबादहून बीडला जाण्यासाठी निघाल्या असता बीड हायवे वर रस्त्यात असलेल्या हाॅटेल देवगिरी समोर त्यांच्या वाहनाचा ताफा थांबला. पंकजा मुंडेंना पाहताच हाॅटेल चालक दिपक शिंदे यांनी त्यांचं अगत्यपूर्वक स्वागत केले. यावेळी हाॅटेलमध्ये बसलेल्या सर्व सामान्य ग्राहकांना त्यांच्या येण्याचं कुतूहल वाटलं. हाॅटेल चालकाच्या आग्रहावरून पंकजा मुंडेंनी मिसळ पाव आणि पोहयाचा आस्वाद घेतला. एवढंच नव्हे तर स्वतः चहा तयार करून घेतला व सोबतच्या कार्यकर्त्यांनाही दिला. यावेळी हॉटेल मालक तसेच इतर ग्राहकांना त्यांचेसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. पंकजा मुंडेंना पाहताच हाॅटेलमध्ये बरीचशी गर्दीही जमली. सर्वांनी त्यांचेसोबत फोटो काढले. पंकजा मुंडे यांनीही सर्वांसोबत मनमोकळा संवाद साधला.
बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांचेशी एकरूप होण्याची किमया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यामध्येही असल्याचे यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहे.
औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील एका छोटया हॉटेलमध्ये सर्व सामान्य ग्राहकांसोबत बसून त्यांनी मिसळ-पावचा आस्वाद घेतला आणि स्वतः चहाही तयार केला यावेळी हॉटेल चालकाची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशीही केली.
पंकजा मुंडे आज सकाळी औरंगाबादहून बीडला जाण्यासाठी निघाल्या असता बीड हायवे वर रस्त्यात असलेल्या हॉटेल देवगिरी समोर त्यांच्या वाहनाचा ताफा थांबला. पंकजा मुंडे यांना पाहताच हॉटेल चालक दिपक शिंदे यांनी त्यांचे अगत्यपूर्वक स्वागत केले. यावेळी हॉटेल मध्ये बसलेल्या सर्व सामान्य ग्राहकांना त्यांच्या येण्याचे कुतूहल वाटले. हॉटेल चालकाच्या आग्रहावरून पंकजा मुंडे यांनी मिसळ-पाव आणि पोहयाचा आस्वाद घेतला. एवढंच नव्हे तर स्वतः चहा तयार करून घेतला व सोबतच्या कार्यकर्त्यांनाही दिला. यावेळी हॉटेल चालक तसेच इतर ग्राहकांना त्यांचेसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.पंकजा मुंडेंना पाहताच हॉटेलमध्ये बरीचशी गर्दीही जमली.सर्वांनी त्यांचेसोबत फोटो काढले. पंकजा मुंडे यांनी देखील सर्वांसोबत मनमोकळा संवाद साधला.