ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

दिवाळीमध्ये पाणी टंचाई भासणार नाही यासाठी केज नगरपंचायत दक्ष,४५लाख रुपये भरून केज आणि धारूरचा पाण्याचा प्रश सुरुळीत…


 

दिवाळीमध्ये पाणी टंचाई भासणार नाही यासाठी केज नगरपंचायत दक्ष आहे,४५लाख रुपये भरून केज आणि धारूरचा पाण्याचा प्रश सुरुळीत…

केज : जनविकास परिवर्तन आघाडीने व काँग्रेसच्या माध्यमातून केज शहराला स्वच्छ पाणी देण्याचे वचन दिले होते.ते सुद्धा पूर्ण झाले आहे.केज शहराला कमीत कमी सहा दिवसाला पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे व चालू आहे. स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याचे जे स्वप्न होते ते पूर्ण झाले आहे.

काही विरोधकाने सोशल मीडियावर चौकशी न करता नगरपंचायत च्या विरोधात काही पण वास्तव करून चुकीचे अपशब्द वापरले आहे. त्यांना सुद्धा केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी देव सुद्धा त्यांना सद्बुद्धी देवो.
केज शहराला विजयी दसरा( नवरात्र महोत्सवा) मध्ये चांगला पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. सात महिन्यांमध्ये जनविकास परिवर्तन व काँग्रेसच्या हाती केज नगरपंचायत आल्यापासून पैशामुळे कधीही पाणी कनेक्शन कट करू दिला नाही.भविष्यात होणारही नाही यासाठी केज नगरपंचायत काम करत आहे.दिवाळीमध्ये पाणी टंचाई भासणार नाही यासाठी केज नगरपंचायत पूर्णपणे दक्ष आहे.

राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना खूप अडचणी येत असतात.विरोध हा जाणून बुजून केला जातो.तरी आम्ही कुठे ही न थांबता केजच्या जनतेला दिलेला शब्द पुर्ण करणार.राजकारण,समाजकारणाला अध्यात्माची जोड जागर स्त्री शक्तीचा राजकारण,समाजकारण करण्याची संधी अनेक महिलांना मिळते.आरक्षणाच्या धोरणामुळे निवडणुकीच्या राजकारणात वेगवेगळ्या संविधानिक पदावर बसण्याची संधीही अनेकींच्या नशिबी येते पण प्रत्येकीलाच त्या पदाला न्याय देता येतोच असे नाही.किंवा राजकारण,समाजकारणावर आपला ठसा उमटविता येतो असेही नाही. अनेकींच्या बाबतीत परिस्थितीची कारणं असतात पण मिळालेल्या संधीचं सोनं करत स्वत:च वेगळं अस्तित्व निर्माण करणार्‍या समाजसेविका व केजच्या नगराध्यक्षा म्हणून सौ.सीताताई बनसोड जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहेत आहे.

केज शहरात सर्व वार्ड मध्ये आम्ही नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत, त्याचे प्रश्न आम्ही मार्गी लावले व लावत आहेत.
तसेच सर्व वार्ड मध्ये नाली,पाणी,वीज हे सर्व प्रश्न मार्गी लावले.तसेच केजच्या जनतेने आमचं कौतुकही केलं.महिलांचे प्रश मार्गी लावले-(महिलांना केज शहरात लवकरच रोजगार उपलब्ध करून देणार) तसेच पाठीमागे काही दिवसापूर्वी पाऊस पडला होता,नाल्याजाम झाल्या होत्या रस्ते पाण्याने गछ भरेरे होते घाणीचे साम्राज्य होते ते तात्काळ प्रश्न आम्ही मार्गी लावले.विकासाच्या बाबतीत केज नगरपंचायतची सर्व टीम काम करत राहील.

● कुठल्याही सणा-सुदीला रमजान ईद व उरूस असेल गणेशोत्सव असेल,गुढीपाडवा असेल मकर संक्रात असेल,भीम जन्मोत्सव, शिवजन्मोत्सव,बैलपोळा असेल,दसरा असेल दिवाळी असेल कुठल्याही सणासुदीला पाणीटंचाई होणार नाही.सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी सध्या पाण्याचे नियोजन केले जाते.

सौ.सीताताई बनसोड
नगराध्यक्षा केज,नगरपंचायत

●सात महिन्याच्या कार्यकाळामध्ये लाईट बिलासाठी एकदाही लाईट कट होऊ दिली नाही.परंतु सप्टेंबर महिना असल्यामुळे पूर्ण थकबाकी बिल चालू बिल भरणे आवश्यक असते ते बिल ६४लाख रुपये होते.तरी केज व धारूर नगरपालिकेने ४५ लाख रुपये भरून जिल्ह्यामध्ये सगळ्यांच्या आधी लाईट बिल भरून केज व धारूर साठी पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.

श्री.हरून भाई इनामदार
जनविकास आघाडीचे प्रमुख


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button