ती सुंदर असल्याने अटक केली आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न
आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. तिथे असलेल्या चिली नावाच्या हॉटेलमध्ये तिने जेवण केलं पण तिने त्याचं बिल चुकतं केलं नाही. त्यामुळे हॉटेलमालकाने पोलिसांना पाचारण केलं. पोलीस जेव्हा हॉटेलमध्ये आले तेव्हा बसतामी सुरक्षा रक्षकांशी वाद घालत होती.
हॉटेलचं बिल चुकवलं नसल्याच्या कारणाने एका महिलेला अटक करण्यात आली. मात्र तिने सुंदर असल्याने आपल्याला अटक केल्याचा दावा केला आहे. सोबतच पोलिसांनी आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे.
हे प्रकरण अमेरिकेतील असून या घटनेतील महिलेचं नाव हेंड बसतामी असं आहे. ती 28 वर्षांची असून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करते. ती यापूर्वी एका कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर होती.
बसतामी ही गेल्या आठवड्यात रीड आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. तिथे असलेल्या चिली नावाच्या हॉटेलमध्ये तिने जेवण केलं पण तिने त्याचं बिल चुकतं केलं नाही. त्यामुळे हॉटेलमालकाने पोलिसांना पाचारण केलं. पोलीस जेव्हा हॉटेलमध्ये आले तेव्हा बसतामी सुरक्षा रक्षकांशी वाद घालत होती.
पोलिसांनी तत्काळ तिला अटक केली. यावेळी बसतामीने पोलिसांवर थुंकण्याची धमकी देत शिवीगाळ केली, असा आरोप पोलिसांनी केला आहे. तर पोलिसांनी तिला ती सुंदर असल्याने अटक केली आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बसतामीने केला आहे. कारण, पोलिसांनी इतकी सुंदर महिला पाहिली नसल्याचा दावा बसतामीने केला. आता बसतामीला कोर्टात हजर केलं जाणार असून तिला 80 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडलं जाईल अशी शक्यता आहे.