बीड सिंहाच्या मुखातून देखाव्यामध्ये होतो प्रवेश…
बीड : यंदा लाडक्या बाप्पाचं थाटामाटात आगमन झालं आहे. तब्बल दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. जिल्ह्यातील गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. विविध गणेश मंडळांनी वेगवेगळे देखावे साकारले असून आकर्षक देखावे पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.
बीड शहरातील पेठ बीड भागामध्ये 50 ते 60 वर्षांपासून विविध प्रकारचे देखावे साकार करण्याची परंपरा आहे. यावर्षी न्यू गणेश मित्र मंडळाने आगळावेगळा असा जम्मू काश्मीर येथील वैष्णोदेवी चा देखावा साकारला आहे.
खरोखरच भक्तांना वैष्णोमातेचे दर्शन घेतल्याची जाणीव या देखाव्यातून होत आहे.देखावा बनवण्यासाठी लागला तब्बल एक महिनाबीड येथील न्यू गणेश मित्र मंडळाने मागील दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून विविध देखावे सादर केले आहेत. तंटामुक्ती गाव, पाणी आडवा पाणी जिरवा, अमरनाथ, असे देखावे साकारले होते. यावेळी वैष्णो देवीचा देखावा साकारला आहे. हा देखावा बनवण्यासाठी एक महिन्यापासून मंडळातील 10 पेक्षा अधिक सदस्यांनी काम केले.
या देखावा बनवण्यासाठी खराब पोते, लाल मातीचा चिखल, नारळाच्या शेंड्या, टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला. देखावा बनवण्याचे काम तब्बल एक महिना दिवस रात्र सुरू होते. सिंहाच्या मुखातून देखाव्यामध्ये होतो प्रवेश… सिंहाच्या शंभर फूट मोठ्या मुखातून या वैष्णो मातेच्या देखाव्यामध्ये प्रवेश होतो. यामध्ये लाल कलरचा आणि लाल लाईटचा वापर करण्यात आला आहे.
लाईटच्या वापराने देखावा अधिकच उठून दिसत आहे. देखाव्याच्या बाजूस धबधबा देखील करण्यात आला असून त्यामध्ये आकर्षक रंगाची लायटिंग केली आहे.