गणेशाची मिरवणूक दर्ग्यासमोर आली आणी वाचा पूढे काय ?
मिरज : सांगली येथील मिरज येथील एक व्हिडिओ समोर आला असून सध्या तो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. सामाजिक ऐक्याचा पायंडा या व्हिडिओतून सांगली येथील गणेश तरूण मंडळाने घालून दिला आहे.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान काल हा प्रसंग घडला आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सांगलीतील मिरज येथील दर्ग्याजवळील आहे. सध्या गणेशोत्सवाचा उत्साह सगळीकडे असून काल गणेशोत्सवाचा पहिला दिवस होता. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशाची मिरवणूक निघून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अशीच मिरवणूक मिरज येथील एका गणपती मंडळाची चालू असताना ही मिरवणूक दर्ग्यासमोर आली आणि मंडळाने जे गाणं वाजवलं ते पाहून आपलाही उर अभिमानाने भरून येईल.
मंडळाने गणपतीची मिरवणूक दर्ग्याजवळ आल्यावर ‘भर दे झोली मेरी या मोहम्मद’ ही कव्वाली वाजवली. त्यामुळे दोन समाजातील ऐक्याचं दर्शन यावेळी झाले.
हिंदू मुस्लीम या दोन समाजातील ऐक्याचा पायंडा मिरजेतील तरूणांनी घालून दिला असून अनेक लोक या मंडळाचे कौतुक करत आहेत. देशात अनेक मुद्द्यावरून हिंदू मुस्लीमांमध्ये तणाव निर्माण होतो तर एकीकडे अशा घटना दिलासा देतात.