ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेशेत-शिवारसंपादकीय
टोमॅटोची प्रतिकिलोची किंमत 500 रुपयांवर तर कांद्याचा दर चारशे रुपये किलो
आर्थिकदृष्टय़ा दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली आहे. सध्या येथे असलेल्या पूर परिस्थितीमुळे टोमॅटोची प्रतिकिलोची किंमत 500 रुपयांवर गेली आहे, तर कांद्याचा दर चारशे रुपये झाला आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांचे खायचे पुरते वांदे झाले आहेत.
सध्या पाकिस्तानच्या लाहोर आणि पंजाब प्रांतात विनाशकारी पूर परिस्थिती आहे. त्यामुळे बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाब प्रांतातून होणारा भाज्यांचा पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी मंडईतील सर्वच भाज्यांचे दर कमालीचे वाढले आहेत. तसेच इतरही भाज्यांचे दर 100 रुपये किलोच्या घरात आहेत.