बीड पाण्याच्या एका डबक्यात पडून साक्षी 4 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
बीड : खेळता खेळता घरातील चिमुरडीचा जीव जाईल, असा कोणी विचारही केला नव्हता. खेळताना तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. मात्र काही मिनिटात हा आनंद दु:खात परिवर्तीत झाला.
आज सकाळी परळी-गंगाखेड रस्त्यावर ही घटना घडली. येथे औष्णिक विद्यूत केंद्राची राख साठवणुकीची तळं आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या एका डबक्यात पडून साक्षी या 4 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. पवार कुटुंबीय राखेच्या तळ्यापासून साधारण 100 मीटर अंतरावर राहत होतं.
पवार कुटुंबातील 3 भावंड खेळता खेळता राखेच्या तलावात साचलेल्या डबक्याच्या पाण्यात गेले. यावेळी साक्षी आणि तिची दुसरी बहिणी पाण्याच्या डबक्यात खेळत होते. परळी गंगाखेड रस्त्यावरील पांडे पेट्रोल पंपाच्या मागे पवार कुटुंब राहत होते.
खेळता खेळता साक्षी तळ्यात गेली.
यातच ती पाण्याच्या डबक्यात पडली. यानंतर तिला लहान भाऊ घाबरला. त्याने आई-वडिलांना बोलवण्यासाठी घरी धाव घेतली. मात्र कोणी मदतीला येईल, त्याआधीच अनर्थ घडला होता. साक्षीचा जागीच मृत्यू झाला होता.