नरेंद्र मोदी स्वतंत्र्य भारतात जन्मास आलेले आणि ध्वजारोहन करणारे पहिले पंतप्रधान
स्वतंत्र्य दिनी दिल्लीत लाल किल्ल्यावर (Red Fort) देशाचे 14 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी त्यांनी देशाला उद्देशून भाषण दिले. देशाच्या स्वतंत्र्यासाठी स्वत:चे प्राण वेचणाऱ्या असंख्य भारतीय वीर आणि मातांना त्यांनी आदरांजली वाहिली.
नरेंद्र मोदी स्वतंत्र्य भारतात जन्मास आलेले आणि ध्वजारोहन करणारे पहिले पंतप्रधान आहेत, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. देशात शांतता आणि एकता टिकवून ठेवण्यात देशाचे भले असल्याचे मोदी म्हणाले.
यावेळी देशाच्या विविध भागातून स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या प्रसंगी अनेक नागरिक राजधानी दिल्लीत दाखल झाले. देशाला मोठा दैदिप्यमान इतिहास आहे आणि आज या देशाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, त्याबद्दल मोदींनी देशाला शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र मोदींनी सांगितलेले 5 संकल्प
विकसीत भारत पहिला संकल्प
गुलामीचा अंश मिटवणं दुसरा संकल्प
आपल्या वाराश्यावर गर्व हवा
एकता आणि एकजुटीला चौथा संकल्प
नागरिकांचं कर्तव्य पाचवा संकल्प
देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष झाली आहेत. यापुढच्या 25 वर्षात देशाला विकसीत देश म्हणून ओळख आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी इतर देशांनी आपल्याला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असा टोलाही मोदींनी लगावला. विकसीत भारत हाच आपला पहिला संकल्प असला पाहिजे. त्यासाठी सर्वच क्षेत्रात आपल्याला काम करावं लागणार आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे स्वदेशाची नारा देतही मोदींनी आपल्या देशातील वारशावरही प्रत्येकानं गर्व करायला हवा, असंही म्हटलंय.