पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं
संपूर्ण भारत देश आज आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहेत. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले.
या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला उद्देशून भाषण करीत आहेत.
संपूर्ण भारत देश आज आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहेत. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी म्हटलं की, भारतातच नाही तर जगभरात कानाकोपऱ्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत त्याचा मान वाढवला आहे. संपूर्ण जगभरात भारताचा राष्ट्रध्वज अभिमानानं फडकतोय. जगभराती पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
पंतप्रधानांकडून महिला योद्धांना अभिवादन
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या महिला योद्धांना पंतप्रधानांनी अभिवादन केलं. पंतप्रधानांनी म्हटलं की, भारतातील महिला काय करू शकतात हे सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यासाठी अनेक वीर महिला योद्धांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण करून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून येतो. राणी लक्ष्मीबाई, दुर्गाभाभी, बेगर हजरत महल या पराक्रमी महिला योद्धांना अभिवादन.’
‘बलिदान देणाऱ्यां प्रति नतमस्तक होण्याची संधी’
भारतातील असा एकही कोपरा नव्हता, असा कोणताही काळ नव्हता, जेव्हा देशवासियांनी शेकडो वर्षे गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही, आपले आयुष्य पणाला लावलं नाही, यातना सहन केल्या नाहीत, बलिदान दिलं नाही. आज सर्व देशवासियांना अशा प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक बलिदानाला आणि त्याग करणाऱ्या प्रति नतमस्तक होण्याची संधी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.