येथे पुरुषाला दोन लग्ने करावीच लागतात नकार दिल्यास तुरुंगवास
काहीतरीच काय? पण हे खरे आहे, कारण आफ्रिकन इरिट्रिया या देशामध्ये पुरुषाला दोन लग्ने करावीच लागतात नकार दिल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. यासाठी या देशाने एक वेगळाच कायदा केला आहे.
विवाह हे दोन व्यक्ती म्हणजे स्त्री व पुरुष यांच्यातील पवित्र बंधन असते. जगातील प्रत्येक देशात लग्नाबाबत अनेक वेगवगेळ्या प्रथा आहेत. ज्यांचं पालन आजही केले जाते. तर अनेक देशात यासंबंधी विविध नियम देखील आहेत.
पण तुम्ही असा नियम कधी ऐकलात का की प्रत्येक पुरुषाने दोन लग्न केलीच पाहिजेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आफ्रिका खंडातील इरिट्रिया या देशात प्रत्येक पुरुषाला दोनदा लग्न करावे लागते. मग तो आनंदाने लग्न करतो की दुःखी. एवढेच नाही तर पुरुषाने दोन बायका केल्या नाहीत तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते. जो कोणी असे करतो त्याला जन्मठेपेची शिक्षा होते.
इरिट्रियामध्ये हा अनोखा कायदा बनवण्यामागे येथे महिलांची लोकसंख्या आहे. वास्तविक या देशात पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे इथिओपियासोबतचे गृहयुद्ध. पुरुषांसाठी दुहेरी विवाह कायद्याशिवाय महिलांसाठीही कठोर कायदे करण्यात आले आहेत. येथील महिला पुरुषांना दोनदा लग्न करण्यापासून रोखू शकत नाहीत. जर महिलांनी पुरुषांना लग्न करण्यापासून रोखले तर त्यांना तुरुंगवासही होऊ शकतो.