क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड ग्रामसेवकाने मुलीचा विनयभंग केला


राज्यात आणि देशात सातत्याने महिला अत्याचार किंवा विनयभंगाच्या बातम्या समोर येत आहेत. विशेष म्हणजे फक्त शहरीभागच नाही तर खेड्यागावातही महिला सुरक्षित नाहीत. बीडमधील एका गावात तर गतीमंदी मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे या प्रकारावर संताप व्यक्त केला जातोय.

ग्रामसेवकाने एका 28 वर्षीय गतीमंद मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावात घडली आहे. ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेल्या आरोपीने हा गुन्हा केला आहे.

या प्रकरणी पीडीत मुलीच्या आईच्या फर्यादीवरूण चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गतीमंद मुलगी पाणी आणण्यासाठी गेली होती. घराच्या हाकेच्या अंतरावर असताना गावचा ग्रामसेवक हा मोटार सायकलवर आला. त्याने मुलीचा विनयभंग केला.

यावेळी मुलीने आरडाओरड केली असता ग्रामसेवकाने त्या ठिकाणावरूण पळ काढला. पीडितेने संबंधित घटनाक्रम तिच्या आईला सांगितला आणि त्यांनी याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेतली. ग्रामसेवक ईस्माईल वजिर पठाण याच्या विरूद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात विनयभंग आणि अन्य कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button