ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

मोठी बातमी सर्वात भयानक वादळ, लाखो घरे अंधारात; संपूर्ण अमेरिकेवर भयानक संकट; सत्य पाहून हादरून जाल!


मोठी बातमी सर्वात भयानक वादळ, लाखो घरे अंधारात; संपूर्ण अमेरिकेवर भयानक संकट; सत्य पाहून हादरून जाल!

 

अमेरिकेत सध्या वातावरण खूपच बिघडले आहे. अमेरिकेतील उत्तर पूर्वेतील हीमवादळामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वारे आणि रेकॉर्डब्रेक हीमवादळ यामुळे तेथील विमानोड्डाण पूर्णपणे स्थगित करण्यात आले आहे.

 

अचानक हीमवादळ आल्याने हजारो विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तर लाखो घरांतील वीजेचा पुरवठा खंडित झालेला आहे. रविवार ते मंगळवार या काळात एकूण 11 हजार 55 विमानोड्डाण रद्द करण्यात आले आहेत.

सध्या परिस्थिती खराब असल्याने हे विमानोड्डाण रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील National Weather Service ने दिलेल्या माहितीनुसार Rhode Island आणि Massachusetts या भागात अनेक ठिकाणी 37 इंचापर्यंत बर्फ जमा झाला होता.

न्यूयॉर्क सिटीच्या सेंट्रल पार्कमध्ये रविवार ते सोमवार या काळात 20 इंचापर्यंत बर्फ कोसळला. तेथील वैज्ञानिकांच्या मतानुसार गेल्या दशकभरात पहिल्यांदाच अशा प्रकारचे वादळ आलेले आहे. अनेक ठिकाणी प्रति तास दोन ते तीन इंचापर्यंत बर्फवृष्टी झाली.

या भागात वाऱ्याचा वेग 110 मैल प्रति तासावर पोहोचला होता. अमेरिकेतील सध्याचीही ही परिस्थिती लक्षात घेता अमेरिकेतील अनेक राज्यांत आणीबाणी लागू केलेली आहे. न्यूयॉर्क सिटी स्कुल, रस्ते, महामार्ग अनिश्चितकाळासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही परिस्थिती कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा अमेरिकन नागरिक करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button