जनरल नॉलेजताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेलोकशाही विश्लेषण

पृथ्वी १६७० किमी प्रति तास वेगाने फिरते, मग आपल्याला हे जाणवत का नाही? विज्ञानाने उलगडलं नवं रहस्य, वाचा महत्वपूर्ण माहिती …


तुम्ही आत्ताच खुर्चीत बसलाय, चहा पिताय किंवा फोन स्क्रोल करताय. सगळं शांत, स्थिर वाटतंय. पण खरंतर तुमच्या पायाखालची जमीन प्रचंड वेगाने फिरत आहे. पृथ्वी एक फेरी २४ तासांत पूर्ण करते.

विषुववृत्तावर म्हणजे मधल्या भागात हे वेग सुमारे १६७० किलोमीटर प्रति तास असतो. हे वेग बहुतेक फायटर जेटपेक्षा जास्त आहे. तरीही तुम्हाला ना घाम सुटतोय, ना चक्कर येतेय, ना थरथर वाटते. हे कसं शक्य आहे?

हे रहस्य अतिशय सोपं आहे. कारण तुम्ही आणि तुमच्याभोवती सगळं काही एकाच वेगाने फिरतंय..जसं एखादी ट्रेन खूप स्मूथ चालू असेल तेव्हा तुम्हाला वेग जाणवत नाही. तुम्ही आतमध्ये पुस्तक वाचता, चहा पिता, गप्पा मारता. कारण ट्रेनमधलं सगळं जसे की सीट, हवा, तुमचं शरीर सगळं एकाच गतीने हलतंय. त्यामुळे बाहेरचा वेग कळतच नाही.

पृथ्वीवरही नेमकं तसंच आहे. तुम्ही, हवा, झाडं, इमारती, समुद्र, पर्वत सगळं एकत्र फिरतंय. त्यामुळे काहीच फरक पडत नाही. काहीच हलताना दिसत नाही. म्हणूनच सगळं स्थिर वाटतं. यात गुरुत्वाकर्षणचीही खूप मदत होते. पृथ्वी आपल्याला खाली ओढते. फिरण्यामुळे होणारी थोडी बाहेरची शक्ती इतकी कमी असते की ती जाणवतच नाही. विषुववृत्तावर तुमचं वजन अगदी थोडंसं कमी होतं. म्हणजे १०० किलो वजन असणाऱ्याचं वजन ०.३ ग्रॅम इतकं कमी होतं. हे आपल्या शरीराला कळणं शक्यच नाही

आपल्या शरीराला काय जाणवतं?

अचानक वेग बदलणं किंवा दिशा बदलणं. म्हणून कार सरळ चालली तर काही वाटत नाही पण अचानक ब्रेक मारला किंवा वळण घेतलं तर शरीर बाजूला सरकतं. पृथ्वीची फिरण्याची गती खूपच सातत्यपूर्ण आहे. कधीच अचानक वेग वाढत नाही किंवा कमी होत नाही. त्यामुळे आपल्या इंद्रियांना काहीच जाणवत नाही.

मग पृथ्वी फिरतेय हे कसं कळतं? याचे काही संकेत नक्कीच आहेत चाला तर मग याबद्दलही काही पॉईंट्समध्ये जाणून घेऊया..

उत्तर गोलार्धात चक्रीवादळ एका दिशेने (घड्याळाच्या उलट) फिरतं तर दक्षिण गोलार्धात उलट दिशेने. हे फक्त पृथ्वीच्या फिरण्यामुळे होतं.

फौकोचा पेंड्युलम हा सोपा प्रयोग आहे. एक मोठा पेंड्युलम लावला आणि तो तासन्तास फिरू दिला तर तो हळूहळू दिशा बदलताना दिसतो. खरं तर पेंड्युलम स्थिर असतो पण त्याखाली पृथ्वी फिरत असल्यामुळे असं वाटतं.

हवाई जहाज चालवणारे पायलट आणि लांब अंतराच्या क्षेपणास्त्रांमध्ये हे फिरणं विचारात घ्यावं लागतं नाहीतर लक्ष्य चुकतं.

पृथ्वी ४.५ अब्ज वर्षांपासून अशीच फिरतेय. तरीही आपल्याला कधीच जमीन हलताना जाणवली नाही. कारण ही फिरण्याची गती इतकी स्मूथ, इतकी एकसमान आणि इतकी मोठी आहे की आपण सगळे त्याचा एक भाग झालो आहोत. हे समजलं की पृथ्वी किती खास आहे हे कळतं. आपण जिथे आहोत तिथे स्थिर राहूनही खरंतर आपण अंतराळात प्रचंड वेगाने प्रवास करत आहोत. आणि तरीही सगळं किती शांत, किती सुंदर आहे..पृथ्वी म्हणजे फक्त ग्रह नाही तर एक मोठी, स्मूथ आणि जादुई राइड आहे ज्यावर आपण बसलोय पण आपल्याला कधीही वेग जाणवत नाही

 


Related Articles

Back to top button