स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात,भयानक वास्तव,नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार
सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना अंतयात्रा (villagers taken dead body from the flood river) काढावी लागली आहे.
एकीकडे आपला देश प्रगती करत आहे तर दुसरीकडे काही खेडेगावांमध्ये असे भयानक वास्तव पाहायला मिळत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाजवळून जाणाऱ्या हरणा नदीतील हे विदारक दृश्य (villagers taken dead body from the flood river) आहे. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाची स्मशानभूमी हरणा नदीच्या पलीकडे आहे. मात्र राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला (villagers taken dead body from the flood river) होता. या नदीला पूल नसल्यामुळे ग्रामस्थांनी थेट नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.
हरणा नदीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी अनेक वर्षांपासून या पुलासंदर्भात ग्रामस्थांनी मागणी (villagers taken dead body from the flood river) केली आहे. मात्र, तरीसुद्धा प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. आता मृतदेह पाण्यात घेऊन जाण्याची वेळ आली, त्यामुळे आतातरी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.