सौ. के.एस.के. महाविद्यालय, बीड येथे आधुनिक रेकॉर्ड रूमचे डॉ. योगेशभैया क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन

सौ. के.एस.के. महाविद्यालय, बीड येथे आधुनिक रेकॉर्ड रूमचे डॉ. योगेशभैया क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन
सौ . के.एस.के. महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रेकॉर्ड रूमचे उद्घाटन नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) संस्थेचे सचिव डॉ. योगेशभैया क्षीरसागर यांच्या हस्ते आज संपन्न झाले. महाविद्यालयातील प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक व सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने या रेकॉर्ड रूमची उभारणी करण्यात आली आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर यांनी महाविद्यालयातील प्रगतीशील उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले की, श्री. नवनाथ कातखडे यांच्या संकल्पनेतून नवनिर्मित रेकॉर्ड रूममुळे दस्तऐवजीकरणाची अचूकता वाढेल आणि विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध होईल.
प्राचार्यांनीही या रेकॉर्ड रूमच्या माध्यमातून महाविद्यालयातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय नोंदी डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली. नवीन रेकॉर्ड रूममध्ये दस्तऐवज स्कॅनिंग, डिजिटल आर्काइव्हिंग, अग्निसुरक्षा प्रणाली, सुसज्ज फाइलिंग रॅक्स तसेच सीसीटीव्ही देखरेखीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या प्रशासकीय क्षेत्रातील आधुनिकीकरणाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विश्वंभर देशमाने, डॉ. सुधाकर गुट्टे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. जालिंदर कोळेकर व लगड सर सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकवर्ग व सर्व नॉन टीचिंग स्टाफ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










